आईला मारहाण झाल्याचा राग अनावर, जन्मदात्या पित्यावर मुलाने गोळ्या झाडल्या!

मुलाने आपल्या जन्मदात्या पित्यावर 3 गोळ्या झाडत जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय. या घटनेत संतोष लटपटे हे गंभीर जखमी झालेत.

आईला मारहाण झाल्याचा राग अनावर, जन्मदात्या पित्यावर मुलाने गोळ्या झाडल्या!
आष्टीमध्ये मुलाने वडिलांवर गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना
Follow us
| Updated on: May 20, 2021 | 9:45 PM

बीड : आईला मारहाण केल्याच्या रागातून मुलाने जन्मदात्या पित्यावर गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात घडलीय. आष्टी शहरातील विनायकनगर भागात मुलाने आपल्या जन्मदात्या पित्यावर 3 गोळ्या झाडत जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय. या घटनेत संतोष लटपटे हे गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेत दोन गोळ्या लटपटे यांच्या पोटावर लागल्यानं ते गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. (A boy shooting his father in Ashti in Beed district)

घरगुती वादातून किरण लटपटे याने वडील संतोष लटपटे यांच्यावर गोळ्या झाडल्या. घरात सातत्याने छोटे-मोठा वाद होत असल्यानं हा प्रकार घडला असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरु आहे. संतोष लटपटे हे तीन महिन्यांपूर्वी सैन्यदलातून निवृत्त झाले आहेत. आईला मारहाण झाल्याने किरणला राग अनावर झाला आणि त्याने वडिलांवर गोळ्या झाडल्याचं सांगितलं जात आहे. संतोष लटपटे यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नागपुरात प्रॉपर्टीच्या वादातून वडिलांची हत्या

यापूर्वी फेब्रुवारीमध्ये नागपुरात मुलाने प्रॉपर्टीच्या वादातून वडिलांची हत्या केल्याची घटना घडली होती. नागपूरच्या गणेश नगर पोलीस स्टेशन हद्दीतील मोहमद अली चौकात ही घटना घडली. युसूफ शेख असं मृत व्यक्तीचे नाव आहे. तर अनिस शेख असे आरोपी मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिस हा आपल्या वडिलांसोबत एकाच घरात राहत होता. मात्र त्याच्या वडिलांनी राहते घर शेजाऱ्याला विकून टाकले. यानंतर शेजाऱ्याकडून घर खाली करुन देण्यास तगादा लावला होता. यावरुन काही दिवसांपासून बाप-लेकामध्ये वाद सुरु होते. तुम्ही घरं विकलं, मग आम्ही राहायचं कुठे? असा प्रश्न त्याने वडिलांना विचारला.

मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी 11 च्या सुमारास तो वाद चांगलाच विकोपाला गेला. यानंतर मुलाने रागाच्या भरात लोखंडी रॉडने वडिलांच्या डोक्यावर वार केला. हा वार इतका जबरदस्त होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेच्या वेळी त्या मुलाची पत्नी, आई , मुलगी सगळेच घरी होते. मात्र कोणालाही एवढी मोठी घटना घडेल, असे वाटले नव्हते. वडिलांचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच मुलाने स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याबाबतची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली होती.

संबंधित बातम्या :

तरुणीसोबत रुग्णालयात दोस्ती, लॉजवर शरीर संबंध, नंतर फोन स्वीच ऑफ, पीडितेची भावाकडे तक्रार आणि…….

47 व्या वर्षीही अविवाहित असल्याचा राग, चित्रपट दिग्दर्शकाची आई-वडिलांकडून हत्या

A boy shooting his father in Ashti in Beed district

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.