भयानक ! एकीलाही सोडलं नाही, जी आली तिच्यावर…; मानसोपचार तज्ज्ञाच्या कृत्याने नागपूर हादरले
नागपूरातील हुडकेश्वर परिसरात मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम करणाऱ्या इसमाने त्याच्याकडे काऊन्सिलिंगसाठी येणाऱ्या शेकडो महिला, मुली, तरूणींचे लैंगिक शोषण केल्याचे घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. एवढंच नव्हे तर त्यांचे अश्लील फोटो काढून, व्हिडीओज तयार करून तो त्यांना ब्लॅकमेल करायचा आणि वारंवार त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवायचा.
नागपूर शहरात एक अतिशय खळबळजनक आणि लोकांना शरमेने मान खाली घालायला लावेल असे भयानक कृत्य घडले आहे. नागपूरातील हुडकेश्वर परिसरात मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम करणाऱ्या इसमाने त्याच्याकडे काऊन्सिलिंगसाठी येणाऱ्या शेकडो महिला, मुली, तरूणींचे लैंगिक शोषण केल्याचे घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. एवढंच नव्हे तर त्यांचे अश्लील फोटो काढून, व्हिडीओज तयार करून तो त्यांना ब्लॅकमेल करायचा आणि वारंवार त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवायचा. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या मानसोपचार तज्ञाच्या पत्नीलाही आपल्या पतीच्या या काळया कृत्यांची, कारनाम्यांची माहिती होती, आणि तरीही ती गप्प बसली, पतीच्या या कृत्यात तिचाही सहभाग असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. तीन पीडित मुली आणि महिलांनी त्या मानसोपचार तज्ञाविरोधात लेखी तक्रार दिल्याने अखेर त्याची काळी कृत्यं उघडकीस आली आणि त्याचा बुरखा फाटला. याप्रकरणी हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी नागपूर पोलीस आयुक्तांवी विशेष टीम तयार केली आहे.
अनेक मुली आणि महिलांचे केले लैंगिक शोषण
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा 47 वर्षांचा असून नागपूरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून तो मानसोपचार तज्ञ म्हणून काम करत होता. गेल्या 7-8 वर्षांपासून त्याचे हे कारनामे सुरू होते. आरोपीने आतापर्यंत अनेक मुली आणि महिलांचे लैंगिक शोषण केल्याची माहिती समोर आली असून पोलीसांनी जप्त केलेल्या त्याच्या कंप्यूटरमध्ये अनेक व्हिडीओजही आढळले आहेत. 47 वर्षीय आरोपी आहे, ट्रेंड कौन्सिलर आहे, मुलांना एज्युकेशन विषयी कौंसलिंग करायचा, शाळा,करियर विषयी कौन्सिलिंग करायचा.
आरोपीकडे अनेक मुली, तरूणी, महिला या काऊन्सिलिंगसाठी यायच्या . मात्र तो त्यांच्याशी अश्लील चाळे करायचा, त्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घ्यायचा. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पहिलं प्रकरण समोर आलं. आरोपी मानसोपचार तज्ज्ञाने त्याच्या दहा वर्षांपूर्वी त्याच्याकडे येणाऱ्या एका तरुणीला तिचे त्या काळचे काही फोटो पाठवून ब्लॅकमेल करणे सुरू केले. त्याच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळलेल्या सबंधित तरुणीने हिम्मत करून पोलिसांकडे तक्रार केली आणि त्याच्या काळ्या कृत्यांचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली तेव्हा त्याची इतर अनेक कृत्य समोर आली.
पोलिसांनी त्याच्या कॉम्प्युटरची तपासणी केली असता त्यामध्ये अनेक महिलांचे, तरूणींचेफोटो, व्हिडीओ होते. त्यामुळे आरोपी मानसोपचार तज्ज्ञाने आजवर अनेक तरुणी आणि अल्पवयीन मुलींसोबत गैरकृत्य केले असावे असा पोलिसांचा अंदाज आहे. – आरोपीच्या पत्नीला सहआरोपी करुन पत्नी विरोधात गुन्हा दाखल केला . त्याच्या पत्नीलाही या गुन्ह्यांची माहिती होती, मात्र तीही गप्प राहून साथ देत होती. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तो तुरूंगात आहे. सध्या त्याची पत्नी फरार असून पोलीसांकडून तिचा शोध घेण्यात येत आहे.