पुणे हादरलं | दहिसर गोळीबारानंतर पुण्यातही आरोपीने गोळीबार केल्यावर स्वत:ला संपवलं, नेमकं काय प्रकरण?
पुणे परत एकदा गोळीबाराने हादरलं आहे. पुण्यातील औंध परिसरामध्ये ही गोळीबाराची घटना घडली आहे. आरोपीने गोळीबार केल्यानंतर स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची माहिती समजत आहे.
पुणे : सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटना वाढतान दिसत आहेत. पुण्यातून मोठी बातमी समोर आली असून परत एकदा गोळीबार झाला आहे. पुण्यातील औंध परिसरात ही घटना घडली आहे. पुण्यामध्ये आर्थिक वादामधून हा गोळीबार झाल्याची माहिती समजत आहे. गोळीबारा केलेल्या आरोपीनेही त्यानंतर स्वत:वर गोळीबार करत आत्महत्या केली आहे. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या.
आर्थिक वादातून सराफ व्यवसायिकाचा दुकानमालकावर गोळीबार केला. त्यानंतर त्याने स्वत: आत्महत्या केली. दुकानमालक गंभीर जखमी झाला असून रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अनिल सखाराम ढमाले (वय ५२, रा. बालेवाडी) असे आत्महत्या केलेल्या सराफ व्यवसायिकाचे नाव आहे. आकाश गजानन जाधव (वय ३९, रा. बाणेर) असे जखमी झालेल्या दुकानमालकाचे नाव आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
अनिल ज्वेलर्स म्हणून हे दुकान ढमाले चालवत होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात आर्थिक वाद सुरु होता. तीन महिन्यापासून ढमाले यांना दुकानमालक जाधव आर्थिक कारणावरुन त्रास देत होता. आता मला पर्याय नाही, म्हणून मी हा निर्णय घेत असल्याचे ढमाले यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत आढळलं आहे.
अनिल जाधव ने आकाश ढमालेला चहा प्यायच्या बहाण्याने बोलवून थेट डोक्यात गोळ्या झाडल्या. अनिल रिक्षातून औंध परिसरात आला आणि त्याच पिस्तूलातून डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली. अनिलच ज्वेलरी शॉप आहे. तो आकाश चा भाडेकरू होता, त्यांच्यात 4- 5 करोड ची देवाणघेवाण झाली होती, यातून च आकाशवर गोळ्या झाडल्या मग स्वतः गोळ्या झाडून आत्महत्या केली.
आरोपी आणि फिर्यादी यांच्याता नेमक्या कोणत्या व्यवहारामधून हा वादा झाला होता? याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. कारण सराफ व्यवसायिक अनिल ढमाले यांनी या वादातून इतकं टोकचं पाऊल का उचललं? असा नेमका काय वाद झाला होता याचा पोलीस तपास करत आहेत.