Chhattisgarh: सिगारेट कोल्ड्रिंक उधार न दिल्यामुळे आरोपीचं धक्कादायक कृत्य, पोलिस सुद्धा चक्रावले
तुम्ही पान टपरीवाल्याकडून सिगारेट कोल्ड्रिंक उधार घेताय का ? पाहा पोलिसांनी काय कारवाई केली
छत्तीसगड : निराला नगरमध्ये (Nirala Nagar) दोन तरुणांकडून एक भयंकर कृत्य घडलं आहे. सिगारेट कोल्ड्रिंक (cigarette with cold drink) उधार न दिल्यामुळे दोघांनी मिळून सुरुवातीला त्या दुकानाची नासधूस केली. त्यानंतर सुद्धा संतापलेल्या दोघांनी पानपट्टी (Paan Shop) पेटवून दिल्याचं प्रकरण उजेडात आलं आहे. त्यापैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, तर एकजणाचा पोलिस शोध घेत आहेत अशी माहिती एका वेबसाईटने दिली आहे.
आतापर्यंत अनेकदा क्षुल्लक कारणावरुन मारहाण, किंवा धमकी देण्याची प्रकरणं उजेडात आली आहेत. परंतु उधार वस्तू न दिल्यामुळे पानचं दुकान जाळण्याने अनेकांना धक्का बसला आहे. मुख्य आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी आणि दुकानाच्या मालकाने दिली आहे. त्याला ताब्यात घेतल्यानंतर अनेक गोष्टीचा उलघडा होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांचं म्हणणं आहे.
आशीष कछुवाहा असं टपरीच्या चालकाचं नाव आहे. ज्यावेळी दुकानाला आग लागली त्यावेळी लोकांनी आशीषला फोन करुन त्याची कल्पना दिली. ज्यावेळी दोन तरुणांची आणि आशिष यांची वादावादी झाली त्यावेळी आशिया यांनी भांडण टाळण्यासाठी सरळ घर गाठलं होतं. त्यानंतर हा प्रकार झाला.
आरोपी निखिल याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याने गाडीतलं पेट्रोल काढून संपुर्ण टपरीवरती ओतलं. त्यानंतर टपरी पेटवली असल्याची कबूली पोलिसांना दिली आहे.