फसवणुकीचा आणखी एक नवा फंडा, ते भामटे भक्त दुकांदारांनाचा गंडवतात, पहा कसं…

दुकानातून वस्तूंची खरेदी केल्यानंतर या ॲपच्या माध्यमातून ट्रान्झक्शन आयडी तयार करून पेमेंट झाल्याची पावती दुकानदारांना दाखवून त्यांची फसवणूक केली जात आहे.

फसवणुकीचा आणखी एक नवा फंडा, ते भामटे भक्त दुकांदारांनाचा गंडवतात, पहा कसं...
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Nov 12, 2022 | 1:46 PM

नाशिक : डिजिटल व्यवहार करत असतांना काही भामटे यामध्ये फसवणूक करत असल्याचा एक नवीन प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. नाशिकच्या दुकानदारांना ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांपैकी बनावट व्यवहार केल्याचे समोर आले आहे. खरंतर या फसवणुकीच्या घटणेने पोलीसही चक्रावून गेले असून गुन्हेगाराचा शोध घ्यायचा तरी कसा ? असा प्रश्न नाशिकच्या सायबर पोलीसांसमोर निर्माण झाला आहे. डिजिटल इंडियाचा नारा देत असतांना डिजिटल व्यवहार करावे यासाठी सरकारकडून प्रोत्साहित केले जात आहे. पण त्यातही फसवणूक होत असल्याने चिंता वाढत चालली आहे. अशातच नाशिकमधील काही दुकानदारांना बनावट व्यवहार दाखवत फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.

डिजिटल इंडियाच्या माध्यमातून ऑनलाइन व्यवहार करण्यावर भर दिला जात असतांना फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे.

त्यानुसार छोटे-मोठे सर्वच व्यावसायिक ऑनलाईन व्यवहाराला प्राध्यान्य देत असून पाच ते दहा रुपयांपासून हे व्यवहार केल्याचे दिसून येत आहे.

हे सुद्धा वाचा

यासाठी नागरिकांकडून फोन पे, गुगल पे, पेटीएम, ॲमेझान पेसारखे ऑनलाइन पेमेंट ॲपचा वापर केला जात असून प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये हे ॲप दिसून येत आहे.

पेटीएम स्पूफ, प्रंक पेमेंट व फेक पे यांसारख्या काही ॲपच्या माध्यमातून बनावट व्यवहार तयार करून दुकानदारांची, व्यापाऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचे काही प्रकार समोर आले आहेत.

दुकानातून वस्तूंची खरेदी केल्यानंतर या ॲपच्या माध्यमातून ट्रान्झक्शन आयडी तयार करून पेमेंट झाल्याची पावती दुकानदारांना दाखवून त्यांची फसवणूक केली जात आहे.

फोन पे, गुगल पे आणि पेटीएमध्ये ज्या पद्धतीने पैसे पाठवल्यानंतर स्क्रीनवर मेसेज येतो त्याच पद्धतीचा मेसेज या फेक ॲपवरही दिसून येताे. त्यामुळे दुकानदारांना लवकर हा प्रकार लक्षात येत नाही.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.