नवी दिल्ली : श्रद्धा हत्याकांड (Sharaddha Murder Case) प्रकरणी आरोपी आफताब (Aftab Poonawala) याने पोलीस चौकशीत अनेक गोष्टींची कबुली दिलीय. श्रद्धाची हत्या (Shraddha Aftab News) करण्याचा आफताबचा इरादा आधीच पक्का झाला होता. 18 मे आधीही एकदा त्याने तिची हत्या करण्याचा प्लान आखला होता. यावेळी त्याचं श्रद्धासोबत भांडण झालेलं. पण श्रद्धा तेव्हा रडली म्हणून त्याने तिची हत्या करण्याचा प्लॅन कॅन्सल केला होता, असं त्याने पोलिसांनी सांगितलंय.
श्रद्धा आणि आफताब हे दोघं दिल्लीत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. एकमेकांवर त्यांचं प्रेम असलं, तरी त्या दोघांचाही एकमेकांवर प्रचंड संशय होता, अशीही माहिती पोलिसांच्या चौकशीतून समोर आलीय. ते सारखे एकमेकांकडे जीपीएस लोकेशन आणि आसपासचे फोटो मागून शंकेचं निरसन करुन घेत असत, अशी माहिती इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या एका रिपोर्टमधून समोर आलीय.
आपल्या नात्याबद्दल असुरक्षितता वाटू लागल्यानं श्रद्धाने आफताबकडे लग्नाचा तगादा लावला होता. यातून त्यांच्यात भांडणं व्हायची. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान आफताबने श्रद्धाला 18 मे आधीच मारण्याचा प्लॅन रचला होता. पण त्यावेळी झालेल्या भांडणादरम्यान, श्रद्धा रडली होती. त्यामुळे त्याने प्लॅन कॅन्सल केल्याचंही आफताबने पोलिसांना सांगितलं.
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, आफताबने श्रद्धाची गळा दाबून हत्या केली होती. त्यानंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे केले. हे तुकडे ठेवण्यासाठी त्याने एक फ्रिज खरेदी केली होती. धक्कादायक बाब म्हणजे सगळ्यात आधी श्रद्धाच्या यकृतासोबत आतड्यांची त्याने विल्हेवाट लावली होती.
दरम्यान, यानंतर मध्यरात्री 2 वाजता घरातून निघून श्रद्धाच्या तुकडे केलेल्या शरीराचे भाग वेगवेगळ्या ठिकाणी आफताब टाकत होता. आपण करत असलेल्या या कृत्याचा संशय कुणाला येऊ नये आणि श्रद्धा जिवंत आहे, असं भासवण्यासाठी त्याने प्रचंड चालाखी केली.
श्रद्धाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आफताब तिच्या मित्रमैत्रिणींना मेसेज करायचा. सोबत त्याचे श्रद्धाच्या क्रेडिट कार्डचं बिलही भरलं होतं. मुंबईतील तिच्या पत्त्यावर कंपनीने संपर्क करु नये, यासाठी आफताबने सुनियोजित कट रचला होता.
आता समोर आलेल्या माहितीनुसार, पोलीस आफताबची नार्को टेस्ट करणार आहेत. या नार्को टेस्टमधून अधिक खुलासे होतील, असा विश्वास पोलिसांना वाटतोय. अद्यापही श्रद्धाचं शिर पोलिसांना आढळून आलेलं नाही. त्यामुळे या हत्याकांडांचं गूढ आणखी वाढलंय.