कसे असतात सिरियल किलर्स? हात-पाय अन् मेंदूची ठेवण वेगळी? पश्चाताप होतो त्यांना? Shraddha मर्डर केसनंतर विषय चर्चेत!
दिल्लीत झालेल्या Shraddha Murder Case मध्ये दररोज नवे खुलासे होत आहेत. यासोबतच अशा प्रकारे थंड डोक्याने खून करणारे नेमके कोणत्या मातीचे बनलेले असतात, हाही विषय चर्चेत आहे.
नवी दिल्लीः इटलीचे एक डॉक्टर शेजरे लॉम्बोर्सो. यांना फादर ऑफ साइंटिफिक क्रिमिनोलॉजी या नावानेही ओळखलं जातं. 1870 मध्ये त्यांनी एक दावा केला होता. एकानंतर एक खून (Murder) करणाऱ्या गुन्हेगारांच्या (Criminal) शरीराची ठेवण सामान्य लोकांपेक्षा वेगळी असते. त्यांचे हात-पाय लांब आणि कानही लांब असतात. त्यावेळी जेलमध्ये (Jail) शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांबाबत हा निष्कर्ष पडताळून पाहण्यात आला होता.
खून करणाऱ्या कैद्यांचे कान आणि हात दोन्ही लहानच आढळून आले. त्यामुळे डॉक्टर लॉम्बोर्सो यांचं खूप बसं झालं. पण गुन्हेगार आणि विशेषतः खून करणाऱ्या लोकांचा अभ्यास करण्यास तेव्हा नुकतीच सुरुवात झाली होती.
ब्रेने स्कॅनिंगने काय उलगडतं?
हात-पाय, कान-डोळे यांचे कनेक्शन मेंदूपर्यंत असते. 80 च्या दशकात ब्रेन स्कॅनिंगमुळे मेंदूत काय काय घडतं, हे कळू शकलं. फक्त 3पाऊंडांची ही गोष्ट भल्या-भल्या माणसांना झपाटून टाकू शकते.
तुमच्या-आमच्यासारखा कुटुंबात राहणारा, प्रेम करणारा, मनात माणसांविषयी भावना बाळगणारा माणूस अचानक इतका क्रूर का होतो? ब्रेन इमेजने अनेक गोष्टी समोर आल्या. गुन्हेगारांचा मेंदू वेगळ्या प्रकारे काम करतो, कारण तो वेगळाच असतो…
कॅलिफोर्नियात सर्वाधिक खूनी
90 च्या दशकात न्यूरोक्रिमिनोलॉजिस्ट एड्रियन रायन यांनी अमेरिकेतील तुरुंगातील कैद्यांचा अभ्यास केला. थंड डोक्याने खून करणाऱ्या कैद्यांवर त्यांनी विशेष अभ्यास केला. सुरुवातीला कॅलिफोर्नियाला गेले. हत्यांसाठी हे राज्य कुख्यात आहे.
इथल्या 40 पेक्षा जास्त कैद्यांची पीईटी अर्थात पॉझिट्रॉन इमिशन टोमोग्राफी झाली. जेणेकरून त्यांच्या मेंदूतलं बायोकेमिकल फंक्शन कळू शकेल.
सोप्या भाषेत सांगायचं तर त्यांच्या मेंदूत काय कालवाकालव सुरु आहे, याची तपासणी करण्यात आली. या स्कॅनिंगमध्ये एक गोष्ट समान आढळली.
खूनी लोकांच्या मेंदूतील अनेक भाग आकुंचन पावलेले होते. विशेषतः प्री फ्रंटल कॉर्टेक्स. मेंदूचा हा भाग सेल्फ कंट्रोल शिकवतो.
एखाद्याचा राग आला तर आपण तावा-तावाने दात ओठ खातो…पण समोरच्याचं डोकं फोडत नाहीत. धोक्याची सूचना देणाराही हाच भाग असतो. जसे की आपण उंच ठिकाणी उभे आहोत. इथून कोसळू शकतो. अशा कैद्यांच्या मेंदुतील प्री-फ्रंटल खूप लहान आढळून आला.
या निरीक्षणाचंही हसं झालं. काही दिवसानंतर द अनॉटॉमी ऑफ व्हायलन्स या नावाचं पुस्तक आलं. यात डॉक्टर रायन यांनी गुन्हेदारांच्या मेंदूवरील 35 वर्षांच्या अभ्यासातून निर्ष्कर्ष लिहिले. पण तरीही मेंदूतील प्रीफ्रंटल कॉर्टेक्स का आकसतो, हे सिद्ध झालं नाही.
शास्त्रज्ञांच्या मते, हे अनेकदा आनुवंशिक असतं. खोलवर वेदना हेदेखील एक कारण असू शकतं. लहानपणी अत्याचार सहन करणाऱ्यांबाबत हे घडू शकतं.
डॉ. रायन यांचा रेकॉर्डही फार वेगळा नव्हता. संभाव्य गुन्हेगारांप्रमाणे त्यांचा मेंदू होता. ते दारू सेवन करत असत. राग आल्यावर समोरच्या व्यक्तीला मारहाण करत असत. पण या अभ्यासानंतर ते स्वतःवर कंट्रोल करू लागले.
हत्येनंतर पश्चाताप होतो?
अकॅडमिक इनसाइट्स फॉर द थिंकिंग वर्ल्ड यात मेंदूवरील सर्वात ताजे निरीक्षण प्रकाशित झाले आहे. त्यांचे दावेही डॉ. रायन यांच्या दाव्यासारखेच आहेत. क्रिमिनल सायकोपॅथच्या मेंदूत डाग-डाग दिसतात. भावनांवर नियंत्रण ठेवणाऱ्या अमीग्डेला आणि प्रीफ्रंटल कॉर्टेक्स या दोन्हींमधील अंतर वाढले होते. म्हणजेच हे दोन्ही भाग आकसले होते. त्यामुळे हत्यारा खून तर करतो. पण त्यानंतर त्याला पश्चातापही होत नाही.
ब्रेन स्कॅनिंगवर विश्वास नसणाऱ्यांसाठी आणखी एक माहिती आहे. MAOA म्हणजेच मोनोअमीन ऑक्सिडेज ए….. हे न्यूरोट्रान्समीटर मॉलिक्यूल्स आहेत. ज्यावर सेरेटोनिन आणि डोपामाइनद्वारे कंट्रोल ठेवलं जातं. भावना, मूड, झोप, भूक यावर त्यांचं थेट नियंत्रण असतं. इथे गडबड झाली की माणूस स्वतःवरील नियंत्रण गमावतो. त्यामुळेच MAOA ला वॉरियर जीन असेही म्हणतात.