Shraddha Murder : पोलीस कोठडीत वाढ होण्याआधी आफताब कोर्टाला म्हणाला, की….

आफताब पुनावाला याच्या पोलीस कोठडीत वाढ! नेमकी आणखी किती दिवस?

Shraddha Murder : पोलीस कोठडीत वाढ होण्याआधी आफताब कोर्टाला म्हणाला, की....
पोलीस कोठडीत वाढImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 22, 2022 | 12:56 PM

नवी दिल्ली : दिल्लीतील (Delhi crime) महरौली परिसरात झालेल्या श्रद्धा हत्याकांड (Shraddha Murder News) प्रकरणी मुख्य आरोपी आफताब पुनावाला (Aftab Poonawala) याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आलीय. चार दिवसांनी आफताब पुनावाला याची पोलीस कोठडी वाढवण्यात आलीय. आज साकेत कोर्टात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आफताब याला कोर्टासमोर हजर करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी आफताबच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. अजूनही या हत्याकांडप्रकरणी अनेक गूढ प्रश्नांची उत्तरं मिळणं बाकी आहे. त्यामुळे आफताबची पोलीस कोठडी गरजेची असल्याचं पोलिसांनी म्हटलंय.

दरम्यान, यावेळी कोर्टासमोर आफताब याने महत्त्वाचं विधान केलं. मी जे काही गेलं, ते रागाच्या भरात केलं, ती माझी चूक होती, असं त्याने कोर्टासमोर म्हटलं. शिवाय आपण पोलिसांच्या तपासात सहकार्य करत असल्याचंही त्याने कोर्टाला सांगितलं.

आफताबने कोर्टासमोर श्रद्धाचे तुकडे केलेल्या शरीराचे भाग कुठे फेकले आहेत, याची माहिती पोलिसांनी दिली असल्याचं सांगितलं. त्यासाठी पोलिसांना नकाशाही तयार करुन दाखवल्याचं त्याने म्हटलं. पण या घटनेला अनेक महिने उलटून गेलेत. त्यामुळे नेमका ठावठिकाणा आता लक्षात नाही, असंही तो म्हणालाय.

दिल्ली पोलिसांनी श्रद्धा हत्याकांड प्रकरणी तपास करण्यासाठी 14 पथकं तयार केली आहे. या पथकांच्या मदतीने श्रद्धाचं शिर, शरीराचे अवयव, या हत्यारांना श्रद्धाचा खून करण्यात आला, ती हत्यारं, इतर कपडे, या सगळ्याचा शोध घेतला जातोय.

आफताब याची सोमवारी नार्को टेस्ट होण्याची शक्यता होती. मात्र आता पॉलिग्राफ टेस्ट करण्यासही पोलिसांनी परवानगी मिळाली आहे. या दोन्ही टेस्ट नेमक्या केव्हा होतात, याकडेही सगळ्याचं लक्ष लागलंय.

वकिलांचा विरोध

दुसरीकडे आफताबच्या वकिलांनीही कोर्टासमोर युक्तिवाद केला. याआधीच आफताब बराच काळ पोलीस कोठडीत आहे. त्यामुळे पोलिसांनी कोठडीत वाढ करण्याची मागणी केल्यानंतर आफताबच्या वकिलांकडून या मागणीचा विरोध करण्यात आला. 12 नोव्हेंबर रोजी आफताबला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत तो पोलीस कोठडीतच आहे. शिवाय आता यात आणखी चार दिवसांची भर पडलीय.

काय आहे प्रकरण?

18 मे रोजी श्रद्धा वालकर या वसईतील तरुणीची तिचा लिव ईन पार्टनर आफताब पुनावाला याने हत्या केली होती. त्यानंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे करुन ते एका 300 लीटर फ्रिजमध्ये ठेवले होते. इतकंच काय तर आफताबचे हे तुकडे दररोज मध्यरात्री थोडे थोडे करुन वेगवेगळ्या ठिकाणी टाकून देत होता.

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....