Shraddha Walkar News : श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी बंबल ऍपने पोलिसांना उद्देशून म्हटलं की,…

ज्या बंबल ऍपवरुन श्रद्धा आणि आफताब यांची ओळख झाली, त्यांच्याकडून पहिलीच प्रतिक्रिया समोर

Shraddha Walkar News : श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी बंबल ऍपने पोलिसांना उद्देशून म्हटलं की,...
काय म्हटलं त्या डेटिंग ऍपने?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 17, 2022 | 11:35 AM

नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्याकांड (Shraddha Walkar Murder Case) प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आलीय. ज्या डेटिंग ऍपवर श्रद्धा आणि आफताब (Shraddha Aftab News) यांची ओळख झाली होती, त्या डेटिंग ऍपने (Dating App Bumble) एक अधिकृत भूमिका जारी केलीय. पोलिसांनी डेटिंग ऍपची तपासात मदत लागू शकते, असं म्हटलं होतं. पोलिसांनी केलेल्या आवाहनाला डेटिंग ऍपनेही सकारात्मक प्रतिसाद दिलाय. त्यामुळे या हत्याकांडप्रकरणाचं गूढ उकलण्यात पोलिसांना अधिक मदत मिळू शकेल, असा विश्वास व्यक्त केला जातोय. दरम्यान, पोलिसांना मदत करण्याची भूमिका स्पष्ट करतानाच या हत्याकांड प्रकरणीही डेटिंग ऍपने खेद व्यक्त केलाय.

श्रद्धा वालकर आणि आफताब पुनावाला हे बंबल या डेटिंग ऍपद्वारे एकमेकांना भेटले. तिथेच त्यांची ओळख झाली. ओळखीचं रुपांतर नंतर प्रेमात झालं. दोघांच्या घरातल्यांचाही एकमेकांच्या नात्याला विरोध असल्यानं श्रद्धा आणि आफताब लिव्ह ईन रिलेशनशिपमध्ये घर सोडून एकमेकांसोबत राहत होते.

डेटिंग ऍप बंबलने जारी केलेल्या आपल्या अधिकृत भूमिकेनुसार, श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी ते पोलीस आणि इतर तपास यंत्रणांना सहकार्य करण्यास तयार आहेत. कायद्याची मदत करण्यासाठी ते सर्वतोपरी सज्ज असल्याचंही बंबलच्या प्रवक्यांनी म्हटलंय. त्यासाठी एक स्वतंत्र टीमही त्यांच्याकडे असल्याचं बंबल डेटिगं ऍपच्या वतीने सांगण्यात आलंय.

समोर आलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी आफताब पुनावाला याची चौकशी करण्यासाठी आणि त्याने सांगितलेल्या गोष्टी पडताळून पाहण्यासाठी प्रत्येक गोष्टीचा सखोल तपास केला जातोय. बंबल डेटिंग ऍप या तपासात महत्त्वाचा दुवा ठरण्याची शक्यताय. त्यामुळे या ऍपवरील श्रद्धा आणि आफताबच्या अकाऊंटचा डेटा हत्याकांड प्रकरणाचा छडा लावताना कामी येईल, असा विश्वास पोलिसांना आहे.

श्रद्धाच्या आधी आफताब दिल्लीतीलच दुसऱ्या एका तरुणीच्या संपर्कात होता. श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबने या तरुणीशी पुन्हा संपर्क केला होता. तसंच तिला घरी बोलावून तिच्यासोबत शारीरीक संबंधही ठेवले असल्याचं समोर आलं होतं. तर तिसऱ्या एका मुलीलाही तो जाळ्यात अडकवण्याच्या तयारीत असल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला होता.

आफताबने पोलिसांनी चौकशीत सांगितलेल्या उलटसुलट गोष्टींमुळे संभ्रम अधिक वाढलाय. पोलिसांना आफताबवर किती विश्वास ठेवावा, यावरच शंका येऊ लागलीय. त्यामुळे आफताबने सांगितलेली माहिती पडताळून पाहणं आणि ती खरी आहे की नाही, हे तपासणं आता गरजेचं बनलंय. त्या अनुषंगाने नार्को टेस्ट करण्यापासून ते डेटिंग ऍपची मदत घेण्यापर्यंत सर्वतोपरी प्रयत्न दिल्ली पोलिसांकडून केले जातायत.

बंबल डेटिंग ऍप काय आहे?

बंबल डेटिंग ऍप हा अमेरिकेन कंपनीने तयार केलेला एक ऍप आहे. 2014 साली हा ऍप मार्केटमध्ये आला होता. बंबल डेटिंग ऍप व्यावसायिक व्हिटनी बोल्फ हर्ड यांनी बनवला होता. या ऍपवर अनेक तरुण-तरुणी आपला पार्टनर शोधण्यासाठी येत असतात.

'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.