‘थंड डोक्याची माणसं जास्त डेंजर’… आफताबची उत्तरं ऐकून पोलिसही गार, जेलमध्ये पाहा कसा निवांत झोपलाय..

एकिकडे श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट तो लावत होता तर दुसरीकडे त्याने डेटिंग अॅपवर आणखी एका मुलीला जाळ्यात अडकवलं होतं.

'थंड डोक्याची माणसं जास्त डेंजर'... आफताबची उत्तरं ऐकून पोलिसही गार, जेलमध्ये पाहा कसा निवांत झोपलाय..
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Nov 16, 2022 | 3:28 PM

मुंबईः काही तरी कारणावरून थयथयाट करणारी माणसं एकवेळ परवडली. पण थंड डोक्याने काटा काढणारी माणसं जास्त डेंजर असतात. मुंबईतली श्रद्धा वालकर हिचा (Shraddha Walkar) आफताब पुनावालाने (Aftab Punawala) केलेला खून आणि त्यानंतर मृतदेहाची थरारक विल्हेवाटीचा प्रसंग ऐकून तर या म्हणीवर विश्वास बसतोय. माणसांच्या जातीत जन्माला आलेल्या हिंस्र प्राण्याचं थंड वागणं पाहून संतप्त प्रतिक्रिया उमटतायत. तर या प्रकरणाचा (Murder case) तपास करणारी यंत्रणा एकानंतर एक धक्कादायक खुलाशांनी चक्रावून जातेय.

मुंबई जवळील पालघरची श्रद्धा वालकर हिचा लिव्ह इन पार्टनर आफताब पूनावालाने तिचा खून केला. त्यानंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे केले. ते फ्रिजमध्ये ठेवले. दररोज एक तुकडा घेऊन तो जंगलात टाकायला जात असे. इतकं क्रूर कृत्य करताना आणि ते कसं केलं हे सांगताना आफताब अत्यंत थंड होता. पोलिसांच्या प्रश्नांना त्यानं दिलेली उत्तरंच चक्रावून टाकणारी आहेत.. एका वृत्तानुसार, पोलिसांनी विचारलेली काही प्रश्नोत्तरं अशी–

श्रद्धाचा खून कसा आणि का केला?

आफताब– 18 मे रोजी बुधवारी श्रद्धाशी वाद झाला. आधीही होत होता. पण त्या दिवशी जरा जास्त झाला. दोघांमध्ये मारामारी झाली. मग मी तिला उचलून आपटलं.. तिच्या छातीवर बसलो आणि दोन्ही हातांनी गळा दाबला. काही वेळातच तिचा श्वास थांबला.

पोलीस- नंतर मृतदेहाचं काय केलं?

आफताब– त्या दिवशी रात्री श्रद्धाचा मृतदेह ओढत बाथरूममध्ये नेला. रात्रभर तो तिथेच होता.

पोलीस- मृतदेहाचे तुकडे कसे आणि कधी केले?

आफताब- 19 मे रोजी मी बाजारात गेलो. लोकल मार्केटमधून 300 लीटरचं फ्रीज घेतलं. कीर्ति इलेक्ट्रॉनिक्स शॉपमधून. आणखी एका दुकानातून आरी घेतली. रात्री त्याच बाथरूममध्ये मृतदेहाचे तुकडे केले. मी काही दिवस शेफची नोकरी केली. त्यामुळे चिकन, मटणाचे पीस करण्याची ट्रेनिंग मिळाली होती. 19 मे रोजी मी मृतदेहाचे तुकडे केले. पॉलिथिनमध्ये टाकले. त्यानंतर ते फ्रिजमध्ये ठेवले. उर्वरीत भाग फ्रिजच्या खालच्या भागात ठेवला…

पोलीस-किती दिवस तुकडे केले?

आफताब– दोन दिवस. 19 आणि 20 मे.

पोलीस- पुढे काय केलं?

आफताब– 19 आणि 20 मे रोजी रात्री महरौली जंगलात काही तुकडे फेकले. पण जंगलात गेलो नाही. मी जवळपास 20 दिवस हे तुकडे फेकत होतो. रात्रीची वेळ होती, त्यामुळे फार जागा सांगता येत नाही.

पोलीस- 20 दिवस तुझं हेच रूटीन होतं?

आफताब– हो. मी घराच्या बाहेरही निघत नव्हतो. फ्रिजमधले तुकडे खाली-वर करत होतो. जेणेकरून एकदम दुर्गंधी येऊ नये. घर, फरश्या, बाथरुमची केमिकलने सफाई करत होतो..

पोलीस– जिच्यावर तू प्रेम केलं, तिचा असा खून करताना तुला काहीच वाटलं नाही? आफताब- नाही. मला राग आला होता. तिच्या घरच्यांना हे कळू नये, अशी माझी इच्छा होती. तसेही ती घरच्यांपासून दूरच होती. तिला शोधायला कुणी येणार नाही, असं वाटत होतं. त्यामुळे हा खून लपवण्यासाठी जे जे काय करता येईल, ते मी केलं.

आफताब आता कुठे आहे?

आफताबने त्याचा गुन्हा कबूल केलाय. सध्या तो पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे. पण एवढं क्रूर कृत्य केलेला आफताब जेलमध्ये किती शांतपणे झोपलाय, त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. याची पुष्टी सध्या करण्यात आलेली नाही.

अटक केल्यानंतरही आफताब फक्त एकदाच रडला असं म्हटलं जातंय. एकिकडे श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट तो लावत होता तर दुसरीकडे त्याने डेटिंग अॅपवर आणखी एका मुलीला जाळ्यात अडकवलं होतं. तिलाही फ्लॅटवर बोलावून शरीरसंबंध ठेवले होते..

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.