आम्ही श्रद्धाच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन आफताबकडे गेलो होतो, त्या दिवशी… वडिलांनी सांगितलेला तो अपमानाचा प्रसंग काय?

2019 मध्ये मुंबईच्या एका कॉल सेंटरमध्ये श्रद्धा आणि आफताबची भेट झाली होती. त्यानंतर दोघे प्रेमात पडले.

आम्ही श्रद्धाच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन आफताबकडे गेलो होतो, त्या दिवशी... वडिलांनी सांगितलेला तो अपमानाचा प्रसंग काय?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Nov 21, 2022 | 12:20 PM

मुंबईः श्रद्धा वालकर  (Sharddha Walkar) हत्याकांड (Murder case) प्रकरणावरून लिव्ह इन रिलेशनशिप (Live in Relationship), नाते संबंध, लव्ह जिहाद यांसारख्या मुद्द्यांवर जोरदार चर्चा सुरु आहे. सोशल मीडियातून या नाजूक प्रश्नांवर परखड मतं मांडली जात आहेत. पण ज्या माय-बापानं हत्येच्या कित्येक वर्ष आधीच आपली मुलगी गमावली होती, त्यांच्यावर सध्या केवढं दुःख ओढवलंय, हे शब्दात सांगता येणार नाही. श्रद्धाची आई सध्या या जगात नाहीये. पण तिच्या आईच्या निधनापूर्वी तीन वर्षांपूर्वीचा एक प्रसंग श्रद्धाच्या वडिलांनी सांगितला.

एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर म्हणाले, ‘ 2019 मध्ये आम्ही आफताब आमीन पुनावाला याच्या कुटुंबियांची भेट घ्यायला गेलो होतो. श्रद्धा आणि आफताबचं लग्न लावून द्यावं, अशी आमची इच्छा होती. माझ्यासोबत श्रद्धाची आईदेखील होती.

पण त्यांनी आमचा खूप अपमान केला. पुन्हा आमच्या घरात पाऊल ठेवायचं नाही. श्रद्धाची आई हर्षिला वालकरही सोबत होती.

या प्रसंगानंतर काही काळाने श्रद्धाची आई वारली. पण त्यानंतर कधीही आम्ही आफताबच्या कुटुंबियांना भेटण्याचा प्रयत्न केला नाही, असं श्रद्धाच्या वडिलांनी सांगितलं.

त्या दिवशी आफताबच्या चुलत भावाने श्रद्धाच्या कुटुंबियांचा खूप अपमान केला. तेव्हा त्यांनी लग्नाचा प्रस्ताव मान्य केला असता तर आज एवढी मोठी घटना घडली नसती, असं श्रद्धाचे वडील म्हणाले.

विकास वालकर म्हणाले, श्रद्धाने आमचं ऐकलं नाही आणि आफताबसोबत राहायला गेली. पण नंतर तिने आईजवळ सांगितलं होतं. आफताब तिला टॉर्चर करत होता. आईच्या मृत्यूनंतर श्रद्धाने मलाही हेच सांगितलं होतं. मी तिला परत ये म्हणालो, पण ती पुन्हा आफताबकडे गेली.

त्यानंतर अनेक महिने श्रद्धा आणि तिच्या वडिलांचा संपर्क नव्हता. ती आफताबसोबत दिल्लीला गेल्याचंही विकास वालकर यांना माहिती नव्हतं.

श्रद्धा हत्याकांडाचे एक एक धागेदोर उलगडत असताना आफताबच्या कुटुंबावरही प्रश्नचिन्ह आहे. काही आठवड्यांपूर्वी आफताबचे कुटुंबीय वसईतून मुंबईबाहेर गेल्याचे सांगम्यात येत आहे. आफताबला अटक झाल्यानंतर त्यांच्या नव्या फ्लॅटलाही कुलूप लावल्याचे दिसून येत आहे, अशी माहिती शेजाऱ्यांनी पीटीआयशी बोलताना दिली.

दिवाळीच्या दरम्यान, आफताबचे कुटुंबीय मीरा रोज येथील 2 बेडरूमच्या फ्लॅटमध्ये रहायला गेले. आफताबचे आई-वडील आधी कचरा टाकायला आल्यावर बाहेर दिसायचे. मात्र हल्ली ते दिसत नसल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं. 2019 मध्ये मुंबईच्या एका कॉल सेंटरमध्ये श्रद्धा आणि आफताबची भेट झाली होती. त्यानंतर दोघे प्रेमात पडले. श्रद्धा वालकर ही महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील रहिवासी आहे. 18 मे 2022 रोजी दोघांमधील वाद विकोपाला गेल्याने श्रद्धाची गळा दाबून हत्या केल्याची कबूली आफताबने दिली आहे. खून केल्यानंतर आफताबने तिच्या शरीराचे 35 तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवले आणि त्यानंतर अनेक दिवस तो एक-एक तुकडा जंगलात फेकत होता.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.