Sidhu Moosewala Murder : मुसेवाला हत्याप्रकरणी मोठा ब्रेक थ्रू! मुख्य आरोपीला कॅलिफॉर्नियातून अटक
सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणी पोलिसांच्या तपासाला मोठं यश! कोण आहे मुख्य आरोपी? वाचा सविस्तर
सिद्धू मुसेवाला हत्याकांड (Sidhu Moosewala Murder case) प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना मोठ यश मिळालं आहे. या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी गोल्डी बराड (Goldi Barad) याला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. अमेरिकेतून गोल्डी बराड याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. कॅलिफोर्निया शहरातून त्याला ताब्यात घेतलं गेल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. टीव्ही 9 भारतवर्षचे प्रतिनिधी जितेंद्र कुमार शर्मा यांनी दिलेल्या वृत्तानुसार, गोल्डी बराड हा कॅलिफॉर्नियात (California) असल्याची माहिती गुप्त खबऱ्यांद्वारे मिळाली होती. कॅनडामध्ये त्याच्या जीवाला धोका असल्यामुळे तो कॅलिफॉर्निया शहरात स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लपून बसला होता, असंही सांगितलं जातं.
भारतीय सुरक्षा यंत्रणांनी 20 नोव्हेंबरच्या दरम्यान, गोल्डी बराड याला ताब्यात घेतलं. दरम्यान, कॅलिफॉर्नियाच्या वतीने अद्याप याबाबत कोणताही माहिती भारत सरकारला देण्यात आलेली नाही.
रॉ, आयबी आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला आणि पंजाबच्या गुप्तचर यंत्रणांना गोल्डी कॅलिफॉर्नियात असल्याची माहिती मिळाली होती. खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गोल्डीला पकडण्यासाठी सापळा रचला गेला होता. तिथे त्याचा ठावठिकाणा नेमका काय आहे, याचाही शोध घण्यात आला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
कॅलिफॉर्निया शहरातील सॅक्रामेंटो, फ्रिजो आणि साल्ट लेक या ठिकाणी एका सेफ हाऊसमध्ये गोल्डी बराक थांबला होता. सध्या तो फ्रेस्को शहरात राहत होता अशीही माहिती समोर आली.
सिद्धू मुसेवाला हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला गोल्डी बराक हा पेशाने ट्रक ड्रायव्हरचं काम करत होता. कॅनडामध्ये सिद्धू मुसेवाला याचे असंख्य चाहते आहेत. तिथं राहणं आपल्या जीवासाठी धोकादायक असल्यानं तो कॅलिफॉर्नियात लपला होता. शिवाय कॅनडामध्ये बमबिहा गँगचेही अनेक गुंडांसह लॉरेन्स बिश्नोईदेखील गोल्डी बराच्या शत्रूंपैकी असल्याचं सांगितलं जातं.
गोल्जी बराड याने कॅलिफॉर्निया शहरात राजकीय शरण येण्यासाठी अपिल केलं होतं. आपण पकडले गेलो, तरी आपल्याला पुन्हा भारतात घेऊन जाणं सहज शक्य होऊ नये, यासाठी त्याने ही खेळी केली होती. पण गोल्डी बराड याच्याबाबत माहिती मिळाल्यानंतर एका वकिलाने त्याच्या बाजूने खटला लढवण्यास साफ नकार दिला होता, अशीही माहिती समोर आली आहे. त्यानंतर गोल्डी याने दुसऱ्या एका वकिलाची मदत घेतली.
ज्या देशात आपल्यावर अन्याय झाला आहे, त्या देशात आपल्याला न्याय मिळण्याची शक्यता नाही, असं भासवून अनेकदा गुन्हेगार दुसऱ्या देशात जाऊन राजकीय शरणागती पत्करतात.