भारतीयांच्या हत्येने अमेरिका पुन्हा हादरली, गोळीबारात आठ जणांचा मृत्यू, शीख समुदायातील चौघे

भारतीय वंशाच्या अमेरिकन शीख समुदायातील चौघा व्यक्तींचा गोळीबारात मृत्यू झाला (Sikh community Indianapolis shooting)

भारतीयांच्या हत्येने अमेरिका पुन्हा हादरली, गोळीबारात आठ जणांचा मृत्यू, शीख समुदायातील चौघे
फोटो - रॉयटर्स
Follow us
| Updated on: Apr 17, 2021 | 11:20 AM

वॉशिंग्टन : अमेरिकेतील इंडियानापोलीस (Indianapolis) शहरात झालेल्या गोळीबारात शीख समुदायातील चौघा जणांचा मृत्यू झाला. फेडएक्स फॅसिलिटीबाहेर (FedEx facility) गुरुवारी रात्री झालेल्या गोळीबारात आठ जणांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी आहेत. बीडमधील रुद्रावार दाम्पत्याच्या हत्या-आत्महत्या प्रकरणाचे गूढ कायम असताना भारतीयांच्या हत्येने अमेरिका पुन्हा हादरली. (Sikh community four members among victims of Indianapolis shooting)

भारतीय वंशाच्या अमेरिकन शीख समुदायातील व्यक्तींचा गोळीबारात मृत्यू झाल्याच्या वृत्ताला अमेरिकेतील भारतीय दुतावासाने दुजोरा दिला. “इंडियानापोलीस पोलिसांनी गोळीबारातील मृतांची ओळख पटवली आहे. पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत केली जाईल. आम्ही पीडित कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत” असं स्थानिक पोलिसांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

अमेरिकन युवकाची गोळीबारानंतर आत्महत्या 

19 वर्षीय तरुणाने फेडएक्स फॅसिलिटीबाहेर गुरुवारी रात्री गोळीबार केला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी स्वतःवर गोळी झाडली. ब्रँडन स्कॉट होल (Brandon Scott Hole) अशी आरोपीची ओळख पटली आहे. तो इंडियाना राज्याचा रहिवासी आहे. होलने केलेल्या गोळीबाराचं कारण अद्याप स्पष्ट नाही. आरोपीसह एकूण नऊ जणांनी या दुर्घटनेत प्राण गमावले.

अमेरिकेत आशियाई समुदायावर होणाऱ्या हल्ल्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. मार्च महिन्यात अटलांटातील दोन मसाज पार्लरमध्ये आठ जणांची हत्या करण्यात आली होती. त्यामध्ये सहा आशियाई-अमेरिकन महिलांचा समावेश होता. त्यामुळे हेट क्राईमबद्दल (hate crimes) काळजी व्यक्त केली जात आहे. अमेरिकेत सध्या पाच लाख शीख समुदायाचे नागरिक असल्याची माहिती आहे.

संबंधित बातम्या :

मैत्रिणीशी जवळीक खटकली, अमेरिकेत 32 वर्षीय भारतीय इंजिनिअरची हत्या

अमेरिकेत ‘हेट क्राईम’मध्ये वाढ; दशकातील सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद

VIDEO | शरणागतीच्या तयारीतील 13 वर्षीय तरुणाची गोळी झाडून हत्या, Chicago पोलिसांचा क्रूर चेहरा उघड

(Sikh community four members among victims of Indianapolis shooting)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.