प्रेम माझ्यावर, लग्न तिच्याशी …? वहिनीने दीराला धू-धू धुतलं, भररस्त्यात तमाशा…
पाटणा येथे भररस्त्यात वहिनीने तिच्या दीराची धुलाई केली. तोही मागे नव्हता, त्यानेही वहिनीला मारहाण केली. हे पाहून आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना बोलावलं. पोलिसांन त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्यये नेलं. मात्र तेथे चौकशीदरम्यान जे समोर आलं ते ऐकून पोलीसही थक्क झाले
प्रेमात माणूस काहीही करू शकतो. प्रसंगी जीव देऊ शकतो पण वेळ आली तर एखाद्याच्या जीवावरही उठू शकतो. प्रेमात पडलेली व्यक्ती काय करू शकते, याचाच एक थरारक अनुभव बिहारच्या पाटण्याजवळील जंक्शन गोलंबर येथे आला. तेथे भररस्त्यात वहिनी आणि दीराची बेदम मारमारी झाली, दोघांनीही एकमेकांना मारलं. दीर-वहिनीचं हे भांडण पाहून रस्त्यावरचे लोकंही थक्क झालं. ती महिला तर तिच्या दीराला जीव खाऊन मारत होती, तर दीरही काही कमी नाही. त्यानेही तिला चोख प्रत्युत्तर दिलं. मात्र हे भांडण पाहून बघ्यांपैकी कोणीतरी पोलिसांना याची सूचना दिली. पोलीस तिथे येताच हा हायव्होल्टेज ड्राम पाहून थक्क झाले. अखेर त्यांनी दोघांना ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनमध्ये नेलं.
तेथे त्यांनी दीर आणि वहिनी दोघांचीही चौकशी केली, रस्त्यावर मारहाण का केली असंही विचारण्यात आलं. तेव्हा त्या महिलेने लावलेले आरोप ऐकून पोलीसही हैराण झाले. आपल्या पतीचं निधन झाल्यानंतर याच दीराने आपल्याला लग्न करण्याचं वचन दिलं होतं, पण तसं घडलं नाही. सासरी छळ झाल्यानंतर ती महिला घरी निघून गेली. थोड्या दिवसांनी ती परत आली तर कोणीच तिला घरात घुसू दिलं नाही. माझ्याशी प्रेमाचं नाटक करून आता हा ( दीर) दुसऱ्या मुलीशीच लग्न करतोय असा आरोप महिलेने लावला.
काय म्हणाली महिला ?
रागिणी कुमार असे महिलेचे नाव असून 2017 मध्ये तिचे लग्न नालंदा येथील दिनेश कुमारसोबत झाले होते. लग्नाच्या तीन वर्षांनी 2020 मध्ये दिनेश यांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या काळात त्याने अखेरचा श्वास घेतला. यानंतर पतीचा लहान भाऊ, रागिणीच्या दीराने तिला प्रेमाचा जाळ्यात ओढलं, मी तुझ्याशी लग्न करेन असं वचन त्याने तिला दिलं आणि त्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केलं. 6 महिने ते एकत्र होते. मात्र त्यानंतर सासरच्या लोकांनी तिचा छळ केला, घरातून हाकललं. ती आपल्या लहान मुलीसह माहेरी राहिली. मध्येच ती तिच्या सासरच्या घरी जायची पण एक-दोन महिन्यांनी सासरचे लोक घरातून पुन्हा हाकलून लावत. त्या महिलेच्या म्हणण्यानुसार पतीच्या मृत्यूनंतर आदर दाखवत तिच्या दीराने तिला लग्नाचे आश्वासन दिले होते. पण ते पूर्ण झाले नाही. महिला सासरच्या घरी राहण्यासाठी गेली असता तिला मारहाण करून पळवून लावण्यात आलं. यानंतर नूर सराय पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
लग्न थांबवण्याचा प्रयत्न
मात्र आता त्याच दीराचे दुसऱ्या मुलीशी लग्न होणार आहे. रागिणीचा धाकटा दीर हा 10 डिसेंबरला लग्न करणार आहे. याची माहिती मिळताच हे लग्न थांबवण्यासाठी रागिणी तिच्या दीराच्या ऑफीसमध्ये गेली आणि त्याच्याशी वाद घालू लागली. मात्र भांडण वाढलं आणि दोघांनी एकमेकांची धुलाईच केली. मात्र आपली वहिनी पैशांच्या हव्यासाने हे आरोप करत आहे, असा आरोप दीराने लावला आहे.