मेहुणीला बहिण आणि भावोजींवर आला संशय, मुलीची डिएनए चाचणी करताच… नको ते समोर आलं
ही घटना DNA चाचणी समोर आल्यानंतर उघडकीस आली आहे. एका मुलीला तिच्या बहिणीवर आणि भावोजींवर संशय होता. त्यामुळे तिने बहिणीच्या मुलीची DNA चाचणी केली आणि नको ते उघडकीस आले.

कोणत्याही नात्यात संशय येणे हे एखाद्या आजारासारखे असते. या संशयांमुळे एखादे नाते पूर्णपणे बिघडते. त्यामुळे असे म्हटले जाते की नात्यामध्ये एकदाका संशयाची पाल चुक चुकली तर ते नाते पूर्णपणे संपूष्टात येते. अशीच एक घटना नुकतीच घडली आहे. मार्कोस नावाच्या व्यक्तीने 6 वर्षांपूर्वी सोफिया नावाच्या मुलीशी लग्न केले होते. त्यांना चार वर्षांची मुलगी आहे. तिचे नाव एमा असे आहे. सोफिया आणि मार्कोसचे एकमेकांवर प्रचंड प्रेम होते. पण सोफियाच्या बहिणाला त्या दोघांवर संशय आला होता. त्यासाठी तिने जे पाऊल उचलले ते पाहून सर्वजण चकीत झाले.
सोफियाच्या बहिणीच्या लॉराच्या मनात थोडा संशय होता. कारण मार्कोस आणि सोफियाची मुलगी एमा ही दोघांसारखी ही दिसत नव्हती. सोफिया आणि मार्कोसचे डोळे आणि केस काळे आहेत. तर त्यांच्या मुलीचे डोळे हिरवे आणि केस तपकिरी रंगाचे. त्यामुळे मार्कोस एम्माचा पिता होऊ शकत नाही असा तिचा विश्वास होता. रेडिटवर आपली कथा शेअर करताना लॉराने लिहिली की, लग्नाच्या वेळी मार्कोसने सोफियाला प्री-नुप्शियल एग्रीमेंट (लग्नापूर्वी केलेला करार) साइन करण्याची विनंती केली होती. कारण मला सतत वाटत होते की मार्कोस तिला फसवेल.
सत्य काय समोर आले?
या सर्वगोष्टी सुरुच होत्या. यावरून आमच्यामध्ये अनेकदा वाद देखील झाले होते. पण जेव्हा लॉराने एमाच्या वाढदिवशी तिच्या बहिणीला DNA चाचणी करण्याचे किट गिफ्ट म्हणून दिले तेव्हा पाणी डोक्यावरून गेले. जेणेकरून तिचा संशय कायमचा संपेल. मार्कोने केलेल्या पोस्टमध्ये त्याने म्हटले की, ही गोष्ट पाहून मी क्षणभर आश्चर्यचकित झालो, पण नंतर मी हसलो कारण माझा सत्यावर पूर्ण विश्वास होता, परंतु माझ्या पत्नीला याचा राग आला. तिने लॉराला फटकारले आणि म्हणाली, तू खरोखर वेडी आहेस.
त्यावर मार्को म्हणाला की तिला ही चाचणी करू दे जेणेकरून तिच्या मनातील शंका पूर्णपणे दूर होईल. शेवटी माझ्या अपेक्षेप्रमाणेच त्या चाचणीची निकाल लागला. तीन आठवड्यांनंतर आलेल्या अहवालात एमा मार्कोसची खरी मुलगी असल्याचे सिद्ध झाले. म्हणजे सोफियाने कोणाचीही फसवणूक केली नाही आणि मार्कोसचीही चूक नाही. ही घटना व्हायरल होताच सर्वांनी त्यावर कमेंट करत आपापल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. अशा गोष्टींमुळे नाते बिघडते, असे अनेकांचे म्हणणे आहे. तर दुसऱ्याने लिहिले की लोक आता तंत्रज्ञानाचा गैरवापर करत आहेत.