अल्पावधीत जास्त पैसे कमविण्यासाठी सख्ख्या बहिणी चालवत होत्या मोठं रॅकेट, ऐकून डोक्यालाच हात लावल…
नुकतेच बोगस आरोग्य प्रमाणपत्र प्रकरण संपूर्ण राज्यात चर्चिले जात असतांना नोकरीला लावून देतो म्हणून दोन सख्ख्या बहिणी जिल्हा रुग्णालयात फिरत असल्याचे समोर आले आहे.
Nashik Crime : बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रावरुन संपूर्ण राज्यात चर्चेत आलेल्या नाशिकचे जिल्हा रुग्णालय (Civil Hospital) पुन्हा एकदा नव्या घटणेने चर्चेत आले आहे. जिल्हा रुग्णालयात नोकरीला (Job) लावून देतो म्हणून दोन सख्ख्या बहिने रॅकेट (Fraud) चालवत असल्याचे समोर आले आहे. बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवणाऱ्या दोन्ही बहिणी या नाशिकच्या जून नाशिक परिसरातील आहे. या दोन्हीही बहीणींनी आत्तापर्यन्त 16 जणांना त्यांनी गंडा घातल्याची कबुली त्यांनी दिली आहे. नाशिक शहर हद्दीत असलेल्या भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजमेरी मशिदीजवळ, नाईकवाडीपुरा येथे राहणाऱ्या जकीय जुल्फेकार शेख आणि फरीन जुल्फेकार शेख यांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली जात आहे. आपल्या जवळपास राहणाऱ्या बेरोजगार तरुणांना हेरून त्यांना आरोग्य सेवकाच्या नोकरीचे आमिष दाखवून लाखों रुपयांना गंडा घातल्याची कबुली दिल्याने जिल्हा प्रशासनाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
गेल्या काही वर्षांपासून नाशिकचे जिल्हा रुग्णालय नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणावरून राज्यभर चर्चिले जात असते.
नुकतेच बोगस आरोग्य प्रमाणपत्र प्रकरण संपूर्ण राज्यात चर्चिले जात असतांना नोकरीला लावून देतो म्हणून दोन सख्ख्या बहिणी जिल्हा रुग्णालयात फिरत असल्याचे समोर आले आहे.
जिल्हा रुग्णालयात या दोन्हीही बहिणी नर्सच्या वेशात फिरत असायच्या, आजूबाजूला बेरोजगार असलेल्या तरुणांना हेरून सिव्हिलमध्ये नोकरीला लावून देतो म्हणून पैसे घेत असायच्या.
अरबाज सलिम खान या तरुणाची या दोन्ही बहीणींनी अशाच स्वरूपात केल्याने त्याची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने भद्रकाली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे.
भद्रकाली पोलीसांनी याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करून घेत दोन्ही संशयित बहिणींना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
एकूणच जिल्हा रुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार पाहता जिल्हा रुग्णालयातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून यामध्ये रुग्णालायतील कुणाचा सहभाग आहे का ? याचाही तपास केला जात आहे.