कौटुंबिक कार्यक्रमासाठी घरुन निघाला, वेळ होता म्हणून मित्रांशी बोलत उभा राहिला इतक्यात…

मयत तरुणांपैकी नितीश कुमार हा एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी चालला होता. कार्यक्रमाला थोडा वेळ असल्याने तो रस्त्याच्या कडेला आपल्या अन्य पाच मित्रांशी बोलत उभा होता.

कौटुंबिक कार्यक्रमासाठी घरुन निघाला, वेळ होता म्हणून मित्रांशी बोलत उभा राहिला इतक्यात...
बस आणि कार अपघातात तीन तरुण ठारImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 27, 2023 | 6:13 PM

पलामू : झारखंडमध्ये एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. स्कॉर्पिओने दिलेल्या धडकेत चार मित्रांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना मेदिनीनगर एमएमसीएच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी चारही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. आशिष कुमार, विवेक कुमार, नितीश कुमार आणि फिरोज अंसारी अशी अपघातात मयत तरुणांची नावे आहे. जखमींमध्ये स्कॉर्पिओ कार चालकाचाही समावेश आहे. स्कॉर्पिओ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.

सहा मित्र रस्त्याच्या कडेला उभे होते

नौदिहा बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिशूनपूर भांगिया मोरजवळ ही घटना घडली. मयत तरुणांपैकी नितीश कुमार हा एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी चालला होता. कार्यक्रमाला थोडा वेळ असल्याने तो रस्त्याच्या कडेला आपल्या अन्य पाच मित्रांशी बोलत उभा होता.

दारुच्या नशेत चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले

याचदरम्यान एक भरधाव स्कॉर्पिओने सहा मित्रांना चिरडले. दारुच्या नशेत असलेल्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला. या अपघातात चार मित्र जागीच ठार झाले तर अन्य दोन मित्रांसह गाडी चालक जखमी झाला.

हे सुद्धा वाचा

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. अपघातग्रस्त स्कॉर्पिओ कार पोलिसांनी जप्त केली आहे. कार चालकाची ओळख पोलिसांनी पटवली आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.