हैदराबाद : तेलंगणा आणि छत्तीसगढच्या सीमावर्ती भागात सुरु असलेल्या चकमकीत 11 नक्षलींना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे.
तर 6 जणांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. किस्तराममधील जंगल भागात नक्षलवाद्यांसोबत चकमक सुरु आहे. तेलंगणा पोलीस, छत्तीसगढ पोलीस आणि सीआरपीएफने ही संयुक्त कारवाई केली, अशी माहिती तेलंगणातील भद्राद्री कोथागुडेम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुनील दत्त यांनी दिली. तेलंगणा ग्रे हाउंड्स आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक झाली.
सोमवारी सकाळी 10.30 वाजेपर्यंत ही नक्षलविरोधी मोहीम सुरुच होती. पोलिसांचे पथक इथल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. ही कारवाई तेलंगणा ग्रे हाउंड्स आणि नक्षलवाद्यांमध्ये झाल्याचे पोलिसांनी सांगितले. छत्तीसगढच्या नारायणपूर जिल्ह्यात पोलिसांनी दोन इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) जप्त केल्यानंतर काही तासांतच ही चकमक झाली.
6 Naxals killed in encounter in forest area of Kistaram PS limits in border area of Telangana & Chattisgarh. The Op is still continuing, we are monitoring the situation: Sunil Dutt, SP, Bhadradri Kothagudem Dist, Telangana
Encounter took place b/w Telengana Grey Hounds & Naxals— ANI (@ANI) December 27, 2021
जिल्ह्यात नक्षलविरोधी कारवाया करणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्यासाठी आयईडी पेरण्यात आले होते. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, जिल्ह्यात सुरक्षा कर्मचार्यांना लक्ष्य करुन नक्षलवादी आयईडी पेरत आहेत, कारण त्यांना अबुजमाद आणि बस्तर भागातील स्थानिकांचा पाठिंबा कमी होत आहे.
“गेल्या काही महिन्यांत, जिल्ह्यातील बंडखोरग्रस्त भागात कसून शोध घेण्यात येत आहे,” असे एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले. सध्या सुरू असलेल्या कारवाईबाबत अधिक तपशील उपलब्ध झालेला नाही.
संबंधित बातम्या :
पिंपरी पोलिसांची मोठी कारवाई ; योगेश जगताप हत्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश
ट्रकसमोर बाईक आडवी घातली, कोयत्याच्या धाकाने चालकाला लुटलं, अल्पवयीन मुलासह दोघे जेरबंद