बँड पथकासह बैल जोड्यांची मिरवणूक, सोलापुरात नगरसेवकासह 60 जणांवर गुन्हा

अक्कलकोट शहरातील कारंजा चौक येथून कारहुणवी सणाच्या निमित्ताने बँड पथकासह बैल जोड्यांची मिरवणूक काढण्यात आली होती. सोलापूर ग्रामीणच्या उत्तर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बँड पथकासह बैल जोड्यांची मिरवणूक, सोलापुरात नगरसेवकासह 60 जणांवर गुन्हा
सोलापूर नगरसेवकावर गुन्हा
Follow us
| Updated on: Jun 25, 2021 | 11:26 AM

सोलापूर : बैलांची मिरवणूक काढून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सोलापुरात नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरसेवक सद्दाम शेरीकर यांच्यासह साठ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कारहुणवी सणाच्या निमित्ताने अक्कलकोटमध्ये बैलांची मिरवणूक काढण्यात आली होती. (Solapur Corporator booked for Procession with bulls at Akkalkot on Karhunavi)

काय आहे प्रकरण?

अक्कलकोट शहरातील कारंजा चौक येथून कारहुणवी सणाच्या निमित्ताने बँड पथकासह बैल जोड्यांची मिरवणूक काढण्यात आली होती. सोलापूर ग्रामीणच्या उत्तर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये नगरसेवक सद्दाम शेरिकर यांच्यासह 60 जणांचा समावेश आहे.

बैलांची मिरवणूक काढून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात जमाव बंदी आदेश लागू असतानाही मिरवणुकीसाठी गर्दी जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवलीत बैलांची झुंज

नुकतंच, बंदी असतानाही बैलांच्या झुंजीचे आयोजन केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. डोंबिवली पश्चिमेकडील जुन्या डोंबिवली क्रिकेट ग्राऊंडवर आयोजन करण्यात आले होते. जवळपास 1 लाख रुपयांसाठी ही झुंज लावण्यात आली होती. याबाबतचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

क्रिकेट ग्राऊंडवर बैलाची झुंज

काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत बैलगाडीची शर्यत आयोजित करण्यात आली होती. या शर्यतीत हजारोंच्या संख्येने लोक सहभागी झाली होते. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली होती. आता दोन बैलांची झुंज लावल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जुन्या डोंबिवलीतील क्रिकेट ग्राऊंडवर ही झुंज लावण्यात आले होते. जिंकणाऱ्या बैल मालकाला एक लाख रुपये मिळाल्याची माहिती समोर आली होती.

काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर बैल गाडीच्या शर्यतीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. या शर्यतीत हजारोंच्या संख्येने लोक जमा झाले होते. या शर्यतीची माहिती पोलिसांना का मिळाली नाही? असा सवाल उपस्थित केला होता.  या प्रकरणाची गंभीर दखल पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी घेतली होती.

यावेळी शर्यत लावणाऱ्या आणि त्यात भाग घेणाऱ्या 70 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण ताजे असताना आता दुसरा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यातही दोन बैलांची झुंज लावली होती. डोंबिवली पश्चिमेतील क्रीकेट ग्राऊंडवर एक लाखाच्या बक्षिसासाठी या दोन बैलांची झुंज लावण्यात आली.

संबंधित बातम्या : 

VIDEO | बंदी असतानाही डोंबिवलीत बैलांच्या झुंजीचे आयोजन, पोलिसांकडून तपास सुरु 

(Solapur Corporator booked for Procession with bulls at Akkalkot on Karhunavi)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.