एकाने फिट आल्याचं नाटक केलं, गंभीर गुन्ह्यातील चौघे आरोपी माढा सबजेलमधून पळाले

कैदी अकबर पवार याने फिट आल्याचे नाटक केले. यापूर्वीही अकबरला दोन वेळा फिट आली होती. त्यामुळे बंदोबस्तावरील पोलिसांना फिट आल्याचे खरे वाटले.

एकाने फिट आल्याचं नाटक केलं, गंभीर गुन्ह्यातील चौघे आरोपी माढा सबजेलमधून पळाले
माढा सबजेलमधून पळालेले चार कैदी
Follow us
| Updated on: Jul 19, 2021 | 2:38 PM

सोलापूर : सोलापुरातील माढा सबजेलमधून गंभीर गुन्ह्यातील चार आरोपींनी पलायन केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. पलायन केलेले चारही आरोपी न्यायालयीन कोठडीत होते. फिट आल्याचं नाटक केल्यानंतर तुरुंगाचं दार उघडताच चौघांनी पोबारा केला.

बनावट चलनी नोटा प्रकरणात आरोपी सिद्धेश्वर केचे कोठडीत होता, तर आरोपी अकबर पवार हा बेकायदेशीर हत्यार बाळगल्याच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत होता. याशिवाय खुनाचा आरोप असलेला आकाश उर्फ रॉकी भालेकर, पॉक्सो कायद्या अंतर्गत आरोपी तानाजी लोकरे यांनी पलायन केले.

नेमकं काय घडलं?

कैदी अकबर पवार याने फिट आल्याचे नाटक केले. यापूर्वीही अकबरला दोन वेळा फिट आली होती. त्यामुळे बंदोबस्तावरील पोलिसांना फिट आल्याचे खरे वाटले. त्याला माढ्यातील ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी जेलचा दरवाजा उघडल्यावर चौघांनी पलायन केले. कैद्याच्या शोधात विविध ठिकाणी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. सोमवारी सकाळी माढा सबजेलमध्ये हा प्रकार घडला.

नागपुरातून पळालेला कैदी दिल्लीत

यापूर्वी, नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून पळून गेलेल्या कच्च्या कैद्याला गेल्या वर्षी दिल्ली येथून अटक करण्यात आली होती. खटला सुरु असलेला आणि न्यायलयीन कोठडीत असलेला सिजो चंद्रन हा कैदी पळून गेला होता. सिजो चंद्रनला 16 मे रोजी शासकीय मेडिकल रुग्णालयाच्या टीबी वॉर्डात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र संधीचा गैरफायदा घेऊन तो पळून गेला होता.

बहिणीला खोटं सांगून मुक्काम

आरोपी दिल्ली येथील बहिणीकडे गेला असल्याची माहिती पोलिसांना समजली होती, तेव्हा अजनी पोलिसांनी दिल्ली पोलिसांशी संपर्क करुन आरोपी सिजो चंद्रन संदर्भात सूचना दिली. तेव्हा दिल्ली पोलिसांनी त्याला त्याच्या बहिणीच्या घरातून अटक केली. कोरोनाचा धोका वाढला असल्याने महाराष्ट्र शासनाने हजारो कैद्यांची मुक्तता केली आहे, मला देखील सोडून दिल्याची माहिती आरोपीने आपल्या बहिणीला दिली होती.

संबंधित बातम्या :

येरवडा कारागृहातून पाच कैद्यांचे पलायन, तात्पुरत्या जेलच्या खिडकीचे गज कापून पसार

कोरोनामुळे मलाही सोडलंय, नागपूर जेलमधून पळून गेलेला कैदी दिल्लीत बहिणीच्या घरी सापडला

सराईत गुन्हेगार जेलच्या कोव्हिड सेंटरचे गज कापून पळाले, ऊसाच्या शेतात दोन दिवस तळ, सापडले कसे?

(Solapur Madha Sub Jail Four Prisoners fled away from Prison)

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.