तुरीच्या पिकात गांजाचं आंतरपीक, 6 लाख 69 हजारांचा 133 किलो गांजा जप्त
माढा तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी तुरीच्या पिकात अंतर्गत पीक म्हणून गांजाची लागवड केली.
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी भरीव उत्पादनासाठी (Solapur Marijuana Illegal Farming) भलताच प्रकार केल्याचा आता समोर आला आहे. माढा तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी तुरीच्या पिकात अंतर्गत पीक म्हणून गांजाची लागवड केली. माढा तालुक्यातील भावी येथील हा धक्कादायक प्रकार आहे (Solapur Marijuana Illegal Farming).
पोलिसांनी धाड टाकत या शेतकऱ्यांवर कारवाई केली. या प्रकरणात पोलिसांनी तब्बल 6 लाख 69 हजार 500 रुपये किंमतीचा 133 किलो गांजा जप्त केला आहे.
बंडु औदुंबर मोरे, जरीचंद विश्वनाथ मोरे या दोन शेतकऱ्यांनी तूरीच्या पिकात गांजाची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली आणि बंडू मोरेला ताब्यात घेतलं.
बावी गावातल्या आपल्या मालकीच्या शेतात बंडू मोरे आणि जरीचंद मोरे या दोघांनी तुरीच्या पिकामध्ये बेकायदा बिगरपरवाना गाजांच्या झाडांची लागवड करुन दोन ते पाच फुटाची उंचीची झाडाची जोपासना करताना हे दोघे शेतकरी आढळले आहेत. पोलिसांनी तुरीच्या पिकात अंतर्गत पध्दतीने लागवड केलेली गाजाची झाडे काढुन ती जप्त केली गेली.
सांगलीत 52 लाखांचा गांजा जप्त, जत पोलिसांची मोठी कारवाईhttps://t.co/xN3c5ostol@spsangli #MarijuanaSeized
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 3, 2020
Solapur Marijuana Illegal Farming
संबंधित बातम्या :
धुळ्यात पोलिसांकडून गांजाची शेती उद्ध्वस्त, 6 लाखांची गांजा रोपं जप्त