शरद पवारांच्या विश्वासू सहकाऱ्यावर गुन्हा दाखल, विनायकराव पाटलांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल, प्रकरण काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेले माजी आमदार विनायकराव पाटील यांच्यावर कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे.

शरद पवारांच्या विश्वासू सहकाऱ्यावर गुन्हा दाखल, विनायकराव पाटलांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल, प्रकरण काय?
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Apr 07, 2023 | 10:56 AM

सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेल्या विनायकराव पाटील यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायकराव पाटील हे माजी आमदार असून कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये भिसे महाविद्यालयाचे सभासद राजाभाऊ जयवंत सुसलादे यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राचार्य पदाच्या भरती दरम्यान बनावट कागदपत्रे दिल्याचा आरोप माढ्याचे माजी विनायकराव पाटील यांच्यावर करण्यात आला आहे. विनायकराव पाटलांवर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे.

के. एन. भिसे कला, वाणिज्य आणि विनायकराव पाटील सायन्स कॉलेजच्या प्राचार्य भरतीत अफरातफर केल्याचा त्यांचा आरोप आहे. शिक्षण संचालक यांच्याकडे ऑनलाइन अर्ज भरत असतांना त्यांनी बनावट आणि बोगस कागदपत्रे सादर केल्याचा वाद आहे.

हा वाद माढा न्यायालयात गेला होता. त्यावरून न्यायालयाच्या आदेशाने कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये धर्मादाय आयुक्तांच्या न्याय निर्णयाच्या कागदपत्रांत बदल करून प्राचार्य भरती केल्याचा आरोप केला होता.

हे सुद्धा वाचा

संस्थेचे सभासद राजाभाऊ जयवंत सुसलादे यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सोलापूरात खळबळ उडाली असून राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. उलट सुलट चर्चा दबक्या आवाजात होऊ लागली आहे.

संस्थेचे प्राचार्य आर आर पाटील हे सेवानिवृत्त झाल्यानंतर काही आवश्यक बाबी पूर्ण करत असतांना प्राचार्य पद भरतीच्या बाबत शिक्षण संचालकांना अर्ज करण्यात आला होता. ऑनलाइन अर्ज करत असतांना स्वतःच्या लेटरहेडवर सर्व बाबी खऱ्या असल्याचे त्यामध्ये भासवले होते.

त्याच पार्श्वभूमीवर संक्षेच्या सभासद तक्रारदार यांच्या ही बाब निदर्शनास आली होती. त्यावरून ही कारवाई करण्यात आली असून कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रथम दर्शनी विनायकराव पाटील यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत असल्याने पोलिसांच्या तपासाकडे लक्ष लागून आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू म्हणून विनायकराव पाटील यांची ओळख आहे. विनायकराव पाटील हे दोनदा आमदार म्हणून निवडून आले आहे. त्यामध्ये एकदा अपक्ष आणि एकदा कॉंग्रेस पक्षाकडून निवडून आले आहे. त्यामुळे सोलापूरच्या राजकारणात मोठं नाव असलेल्या विनायकराव पाटील यांना हा मोठा दणका मानला जात आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.