साडेसात लाखांची लाच घेताना पोलीस निरीक्षक-उपनिरीक्षक जोडगोळी एसीबीच्या जाळ्यात

मुरुम उपसा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीला मदत करण्यासाठी दोघा पोलिसांनी दहा लाखांची लाच मागितली होती. तडजोडीअंती साडेसात लाख रुपयांची लाच स्वीकारताना ते जाळ्यात अडकले

साडेसात लाखांची लाच घेताना पोलीस निरीक्षक-उपनिरीक्षक जोडगोळी एसीबीच्या जाळ्यात
लाच घेताना दोन पोलीस अधिकारी जाळ्यात
Follow us
| Updated on: Jul 10, 2021 | 3:22 PM

सोलापूर : साडेसात लाख रुपयांची लाच घेताना पीआय आणि एपीआय लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले. पोलीस निरीक्षक संपत पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे यांना सोलापुरात अटक करण्यात आली. मुरुम उपसा प्रकरणातील आरोपीकडे दोघा पोलिस अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याचा आरोप आहे. (Solapur Police Inspector API caught by ACB while taking bribe)

7 लाख 50 हजार रुपयांची लाच घेताना पीआय संपत पवार आणि एपीआय रोहन खंडागळे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले. संपत पवार हे सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक आहेत, तर रोहन खंडागळे तिथेच सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहे.

नेमकं काय झालं

मुरुम उपसा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीला मदत करण्यासाठी दोघांनी दहा लाखांची लाच मागितली होती. तडजोडीअंती साडेसात लाख रुपयांची लाच स्वीकारताना ते लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले. लाचलुचपत विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाच घेताना सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे याला पुणे नाका येथे साडेसात लाख रुपयांच्या लाचेसह रंगेहाथ पकडण्यात आले. पोलीस निरीक्षक संपत पवार यांचादेखील सहभाग असल्याने त्यांना देखील शासकीय विश्रामगृह येथून ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघा आरोपींना आज न्यायालयासमोर उभे केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

रेशनिंग क्लार्क लाच घेताना रंगेहाथ

दुसरीकडे, अंबरनाथ शहरातील रेशनिंग ऑफिसमध्ये नेहमीच भ्रष्टाचाराच्या तक्रारी येत असतात. कुठल्याही लहान मोठ्या कामासाठी पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या होत्या. त्यातच जावसई भागात राहणारे शिवसेनेचे शाखाप्रमुख राजू सोमा यांनी त्यांच्या भागातील दोन जणांचे फाटलेले रेशनकार्ड नव्याने तयार करण्यासाठी, तर एक रेशनकार्ड ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी दिले होते.या प्रत्येक कार्डासाठी 500 रुपये या प्रमाणे 1 हजार 500 रुपयांची लाच मागण्यात आली होती.

शिवसेना शाखाप्रमुखाची तक्रार

खिडकी क्रमांक दोनवरील क्लार्क प्रताप ब्रह्मनाद आणि खिडकी क्रमांक तीनवरील क्लार्क सुनीता हिंदळे यांनी ही लाच मागितली होती. त्यामुळे राजू सोमा यांनी याबाबत ठाणे अँटी करप्शन विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार गुरुवारी सापळा रचून एसीबीने या दोघांनाही लाच घेताना रंगेहाथ अटक केली.

संबंधित बातम्या : 

पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील कर्ज प्रकरण, तीन तत्कालीन अधिकाऱ्यांना अटक

अंबरनाथमध्ये रेशनिंग विभागाचे दोन क्लार्क एसीबीच्या जाळ्यात, दीड हजारांची लाच घेताना रंगेहाथ

(Solapur Police Inspector API caught by ACB while taking bribe)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.