Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अ‌ॅमेझॉन वरुन मागवले कलर प्रिंटर, घरातच बनवत होता बनावट नोटा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बनावट नोटा तयार करणाऱ्या आरोपीला आणि त्याच्या साथीदाराला सोलापूर पोलिसांनी अटक केलीय.

अ‌ॅमेझॉन वरुन मागवले कलर प्रिंटर, घरातच बनवत होता बनावट नोटा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Fake Currency Solapur
Follow us
| Updated on: Jan 25, 2021 | 2:57 PM

सोलापूर : अ‌ॅमेझानवरुन वस्तू खरेदी करण्याचा तरूणाईला अधिक आवड जडलेली असते.कोण काय मागवेल याचा काय नेम नसतो.माढा तालुक्यातील दारफळ (सिना) गावात वास्तव्यास असलेल्या एका तरुणाने अ‌ॅमेझान वरुन कलर प्रिंटर मागवले आणि नामी शक्कल लढवत प्रिंटर आणि ए- पेपर च्या सहाय्याने बनावट नोटा बनवण्याचा जणु उद्योगच घरी सुरु केला होता. मात्र चोराची चोरी फार काळ टिकत नाही असे म्हणतात, हा बहाद्दर आता पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. (Solapur Police take A Action Against 2 Accussed over Fake Currency)

सिद्धेश्वर कैंचे असे या बनावट नोटा तयार करणार्‍या आरोपीचे नाव असून त्याचा साथीदार असलेल्या धनाजी यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दोघा आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

सिद्धेश्वर हा धनाजी दाडे याला सोबत घेऊन मोडनिंबच्या जनावरांच्या बाजारात शेळ्या खरेदीस गेला होता. बाजारात शेतकरी कुंडलिक यमनाथ लेंगरे (रा.पोखरापूर) यांच्याकडून सिद्धेश्वरने 8 शेळ्या खरेदी केल्या. 5 हजार रुपये प्रती शेळीप्रमाणे 40 हजाराला व्यवहारही ठरला. सिद्धेश्वरने दिलेल्या नोटांची शेतकरी लैंगरे यांना शंका आली. त्यांनी दुसऱ्या नोटांची सिद्धेश्वर कडे मागणी केली. मात्र सिद्धेश्वर ने याच नोटा माझ्याकडे आहेत मी आताच एटीएममधूनन काढून आणलेत, अशी बतावणी केली मात्र शेतकऱ्याने दुसऱ्या नोटांचा हट्ट धरला. मग मात्र सिद्धेश्वरने तिथून पळ काढला.

बाजारात असलेल्या शेतकरी अन् पोलिसांनी पाठलाग केल्यानंतर सिद्धेश्वर त्यांच्या हाती लागला. एका गाडीमध्ये शेळ्या घेऊन गेलेल्या धनाजीला कुर्डूवाडीतून पोलिसांनी अटक केलं आहे. पोलीस तपासातून कलर प्रिंटरने तो घरातच बनावट नोटा घरातच बनवत असल्याचे बाब समोर आली आहे.

आरोपीचा आणखी कोणकोणत्या गुन्ह्यात सहभाग आहे का? याअगोदर बनावट नोटा खपवल्यात का ? अन्य साथीदार या प्रकरणात आहेत का? या अगोदर शेळ्याची खरेदी केली होती का ? शेळ्याच खरेदी का करीत होता ? यासह अन्य गोष्टींचा उलगडा करण्यासाठी टेंभूर्णी पोलिस कसून तपास करीत आहेत.

(Solapur Police take A Action Against 2 Accussed over Fake Currency)

हे ही वाचा

धुळे पोलिसांची मोठी कारवाई, बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Pune Crime | पुणे बनावट नोटांप्रकरणी 6 आरोपींना 15 जूनपर्यंत पोलीस कोठडी

पुण्यात बनावट नोटांच्या रॅकेटचा भांडाफोड, 47 कोटी 60 लाखांच्या बनावट नोटा जप्त

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.