शेतात हिंडायला गेलेली 3 वर्षांची चिमुरडी घरी परतलीच नाही! शोषखड्ड्यात बुडून राजेश्वरीचा मृत्यू, आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

Solapur News : अकरा-साडकेअकरा वाजल्यापासून राजेश्वरी कुठे दिसली नाही, म्हणून आईला काळजी वाटू लागली. आई, आजी राजेश्वरीला शोधू लागले.

शेतात हिंडायला गेलेली 3 वर्षांची चिमुरडी घरी परतलीच नाही! शोषखड्ड्यात बुडून राजेश्वरीचा मृत्यू, आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
दुःखद घटना...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 07, 2022 | 9:52 AM

सोलापूर : सोलापुरात (Solapur crime news) शोषखड्ड्यात पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. उत्तर सोलापूर (Solapur News) तालुक्यातील भोगाव इथली ही घटना आहे. राजेश्वरी घोडके असं तीन वर्षांच्या मृत चिमुकलीचं नावं असून तिच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जाते आहे. तर तिच्या आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. घरा शेजारी असलेल्या शेतात शोषखड्डा खणण्यात आला होता. त्यात राजेश्वरी बुडाली आणि तिचा मृत्यू (3 year old girl died) झाला. या घटनेमुळे संपूर्ण भोगाववर शोककळा पसरलीय. राजेश्वरी सूर्यकांत घोडके असं या मृत मुलीचं पूर्ण नाव असून शनिवारी सकाळी ही घटना घडली. या घटनेनं सर्वत्र शोककळा पसरली. तर मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या आईवडिलांना केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. मार्डी येथील डॉक्टर भोजने यांच्या इंग्लिश शाळेमध्ये राजेश्वरी शिकत होती. शनिवारी तिच्या शाळेला सुट्टी होती. बराच वेळ राजेश्वरी घरी न परतल्यानं तिच्या आईनो शोधाशोध करण्यास सुरुवात केली. त्यावेळी ही घटना उघडकीस आली.

आईचा आक्रोश

घोडके यांच्या राहत्या घरापासून जवळच असलेल्या शेजारील शेतात शोषखड्डा खणण्यात आला होता. दोन ते तीन दिवस झालेल्या पावसाने या खड्ड्यात पाणी साचलं होतं. या खड्ड्यात राजेश्वरी पडली आणि तिला बाहेर पडताच आलं नाही. आजूबाजूला मदतीसाठीही कुणी नव्हतं. तिचे बुडताना आरडाओरडा केला, पण तोही कुणाच्या कानी पडला नाही. अखेर बराच वेळी राजेश्वरी घरी का आली नाही, म्हणून तिची आई शोधायला बाहेर पडली. मुलगी शोषखड्ड्यात बेशुद्ध पडली आहे, हे पाहून तिच्या आईचे हातपायही थरथर कापू लागले. राजेश्वरीला बाहेर काढून सिव्हिल रुग्णालयात पाठण्यात आलं. पण तिथं तिला मृत घोषित करण्यात आलं.

शाळेला सुट्टी म्हणून..

घोडके कुटुंबीय शेतातच राहत होते. राजेश्वीर ही रोज आपल्या बहिणीसोबत शेतात फिरायला जात असे. सकाळी तिची आई घरच्या कामात गुंतली होती. अकरा-साडकेअकरा वाजल्यापासून राजेश्वरी कुठे दिसली नाही, म्हणून आईला काळजी वाटू लागली. आई, आजी राजेश्वरीला शोधू लागले. शनिवारी शाळेला सुट्टी होती. त्यामुळे मुलगी आणि तिच्या मैत्रिणींसोबत फिरायला जात असे. पण आज उशीर झाला, मुलगी बराच वेळ दिसली नाही, म्हणून घरातल्यांना चिंता वाटू लागली.

हे सुद्धा वाचा

अख्ख गाव शोकाकूल

दरम्यान, शेतातील शोषखड्ड्यातील पाणी खड्ड्याच्या भोवती जमा झाल्याचं दिसलं. राजेश्वरी खड्ड्यात तर पडली नाही ना, अशी शंका येऊन तिथं पाहणी करण्यात आली. त्यावेळी चिखलात तिच्या पावलांचे ठे दिसले. अखेर राजेश्वरी खड्ड्यात पडल्याचं दिसून आलं. तिला उपचारासाठी नेईपर्यंतही उशीर झाला होता. त्याआधी राजेश्वरीने अखेरचा श्वास घेतला होता. अखेर रुग्णालयात तिचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला. या घटनेनं घाटके कुटुंबीयांसह संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला होता.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....