बापलेकात वाद झाला, दोघेही शांत झाले म्हणून आई बाजूला गेली, परत येऊन पाहते तर पायाखालची जमीनच सरकली !

बापलेकामध्ये जमिनीचा वाद टोकाला गेला. दोघांमध्ये जोरदार भांडण झाले आणि काही वेळाने दोघे शांतही झाले. यानंतर आई निघून गेली अन् परत आली तर तिला धक्काच बसला.

बापलेकात वाद झाला, दोघेही शांत झाले म्हणून आई बाजूला गेली, परत येऊन पाहते तर पायाखालची जमीनच सरकली !
कौटुंबिक वादातून सासऱ्याने सुनेला संपवले
Follow us
| Updated on: Jun 18, 2023 | 12:51 PM

अजमेर : राजस्थानमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. जमिनीच्या वादातून मुलाने बापाची हत्या केल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील अजमेर येथे घडली आहे. याप्रकरणी आईच्या फिर्यादीवरुन मुलाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत. बेगाराम असे मयत पित्याचे नाव असून, मुकेश असे आरोपी मुलाचे नाव आहे. पाली जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

जमिनीचा वाद टोकाला गेला अन्…

बाप-बेट्यामध्ये आईसमोरच जमिनीवरुन वाद झाला. काही वेळाने वाद शांत झाला, म्हणून आई तिथून गेली. थोड्या वेळाने परत आली तर समोरचं दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. महिलेचा पती जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. तिने तात्काळ पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

पोलिसांकडून आरोपी ताब्यात

पोलिसांनी महिलेकडे चौकशी केली असता, महिलेने पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. बाप-लेकामध्ये जमिनीवरुन वाद झाला होता. त्यामुळे मुलाने दारुच्या नशेत बापाची हत्या केली असावी, अशी शंका महिलेने पोलिसांकडे व्यक्त केली. यानंतर पोलिसांनी फरार झालेल्या मुलाचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत.

हे सुद्धा वाचा

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.