बायकोसोबत भांडण झाले, जावयाने पत्नी मुलासह सासऱ्यालाही पेटवले !

किशोर आणि आरतीमध्ये सतत भांडणे होत होती. रोजच्या भांडणाला कंटाळून आरती पतीचे घर सोडून माहेरी आली होती. गेल्या दीड महिन्यांपासून आरती मुलासह माहेरी राहत होती.

बायकोसोबत भांडण झाले, जावयाने पत्नी मुलासह सासऱ्यालाही पेटवले !
गोंदियात कौटुंबिक वादातून जावयाने तिघांना जाळलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 15, 2023 | 10:51 AM

गोंदिया / शाहिद पठाण (प्रतिनिधी) : बायकोसोबत झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून जावयाने पत्नी, मुलगा आणि सासऱ्याला पेट्रोल टाकून जाळल्याची भीषण घटना गोंदियात उघडकीस आली आहे. रात्री झोपले असताना जावयाने पेट्रोल टाकून जाळले आणि तेथून फरार झाला. या घटनेत सासऱ्याचा मृत्यू झाला. तर पत्नी आणि मुलगा 90 टक्के भाजले असून, त्यांच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस फरार जावयाचा शोध घेत आहेत. किशोर शेंडे असे आरोपी जावयाचे नाव आहे.

सहा वर्षांपूर्वी झाला होता विवाह

भिवापूर तिरोडा येथील किशोर शेंडे याचे सुर्याटोला येथील आरती मेश्राम हिच्याशी सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. पती किशोर हा मोलमजुरीचे काम करायचा. पत्नी आरती रुग्णालयात हाऊस किपिंगचे काम कराची. दोघांना 4 वर्षाचा मुलगा आहे.

रोजच्या भांडणाला कंटाळून पत्नी माहेरी आली

किशोर आणि आरतीमध्ये सतत भांडणे होत होती. रोजच्या भांडणाला कंटाळून आरती पतीचे घर सोडून माहेरी आली होती. गेल्या दीड महिन्यांपासून आरती मुलासह माहेरी राहत होती. आरतीचे वडिल देवानंद मेश्राम यांना लकवा मारल्याने ते अंथरुणावर होते.

हे सुद्धा वाचा

रात्रीच्या सुमारास तिघांना पेटवले

पत्नी माहेरी आल्याने संतापलेल्या किशोरने काल रात्रीच्या सुमारास सासरवाडीला आला. घरात सगळे झोपले असताना रात्री 12 ते 1 च्या सुमारास किशोरने पेट्रोल टाकून जाळले आणि तेथून पसार झाला.

घटनेची माहिती तात्काळ रामनगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी पत्नी आणि मुलाला रुग्णालयात दाखल केले. सासऱ्याचा मृत्यू झाल्याने मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.