जमिनीचा वाद टोकाला गेला, जावयांनीच चुलत सासऱ्याचा काटा काढला !

वडिलोपार्जित जमिनीवरुन चुलत सासऱ्याने न्यायालयात खटला दाखल केला होता. याच गोष्टीवरुन जावई आणि चुलत सासऱ्यामध्ये वाद सुरु होता. अखेर भररस्त्यात जावयाने जे केले त्याने संपूर्ण जिल्हाच हादरला.

जमिनीचा वाद टोकाला गेला, जावयांनीच चुलत सासऱ्याचा काटा काढला !
जमिनीच्या वादातून जावयांनी सासऱ्यावर गोळ्या झाडल्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 17, 2023 | 10:34 PM

सातारा / संतोष नलावडे : जमिनीच्या वादातून दोघा जावयांनीच चुलत सासऱ्याची गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना आज साताऱ्यात घडली. सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातील वाघोली येथे आज सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. सुनील शंकर भोईटे असे हत्या करण्यात आलेल्या सासऱ्याचे नाव आहे. सासऱ्याची हत्या केल्यानंतर आरोपी जावई स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले. रवी यादव आणि सुनील यादव अशी आरोपी जावयांची नावे आहेत. याप्रकरणी वाठार पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

वडिलोपार्जित जमिनीवरुन सासरे-जावयांमध्ये वाद होता

सुनील भोईटे यांचा भाऊ नामदेव भोईटे यांना दोन विवाहित मुली आहेत. त्यांना मुलगा नाही. रवी यादव याने नामदेव यांच्या हिस्स्याची जमीन विकली असल्याची प्राथमिक माहिती आहे. या वडिलोपार्जित जमिनीसंदर्भात सुनील भोईटे यांनी न्यायालयात दावा दाखल आहे. यावरून नामदेव भोईटे यांचे जावई आणि सुनील भोईटे यांच्यात वाद झाले होते.

सासरे घरी जात असताना वाटेत अडवून गोळ्या झाडल्या

आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सुनील भोईटे आणि त्यांचा मुलगा दुचाकीवरून घराकडे चालले होते. यावेळी नामदेव यांचे जावई रवी यादव आणि सुनिल यादव या दोघांनी वाघोली येथे त्यांना वाटेत अडवून भोईटे यांच्यावर पिस्तूल रोखले. यावेळी भोईटे यांच्या मुलाने आपल्या वडिलांना मारू नका म्हणून हात जोडून विनवण्याही केल्या. मात्र तरीही रवी यादव याने भोईटे यांच्या पोटात आणि छातीत तीन गोळ्या घातल्या.

हे सुद्धा वाचा

गोळीबारानंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर

सुनील भोईटे यांना तातडीने पिंपोडे बुद्रुकच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वीच भोईटे यांचा मृत्यू झाला. रवी यादव आणि सुनिल यादव यांचे मूळ गाव सोळशी हे असून, ते सध्या पुणे येथे वास्तव्यास आहेत. गोळीबाराची घटना घडल्यानंतर दोघेही स्वतःहून वाठार पोलीस ठाण्यात हजर झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेसंदर्भात वाठार पोलीस अधिक तपास करीत आहेत. मात्र या घटनेमुळे वाघोली परिसरात काही वेळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.