पिकअप वाहनाच्या धडकेत इसमाचा मृत्यू, पोलीस अपघाताची चौकशी करायला गेले असता धक्कादायक बाब उघड

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरु केला. तपासादरम्यान पोलिसांनी मयताच्या घरच्यांचीही चौकशी केली. चौकशीदरम्यान पोलिसांना अनिलवर संशय आला.

पिकअप वाहनाच्या धडकेत इसमाचा मृत्यू, पोलीस अपघाताची चौकशी करायला गेले असता धक्कादायक बाब उघड
विम्याच्या पैशासाठी मुलाने वडिलांना संपवलेImage Credit source: Social
Follow us
| Updated on: Nov 19, 2022 | 9:24 PM

बडवानी : मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीचा पिकअप वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता. या अपघातात पोलिसांनी तपास सुरु केला. तपासादरम्यान पोलिसांनी घरच्यांचीही चौकशी केली. मात्र चौकशीदरम्यान जे सत्य समोर आले, त्याने पोलीसही चक्रावले. मुलानेच विम्याच्या पैशासाठी बापाची सुपारी देऊन हत्या केल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी सेंधवा शहर पोलीस ठाण्यात कलम 304 अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

काय आहे प्रकरण?

बडवानी जिल्ह्यातील सेंधवा येथील रहिवासी छगन पवार यांचा आपला मुलगा अनिल पवार याच्याशी वाद होता. छगन पवार यांनी आपला 10 लाखाचा विमा काढला होता. अनिलला या विम्याची माहिती होती.

आधीच पित्यासोबत वाद होता आणि त्यात पित्याच्या विम्याची माहिती होती. त्यामुळे विम्याची रक्कम हडपण्यासाठी मुलाने आपल्या साथीदारांसोबत मिळून वडिलांच्या हत्येचा कट रचला. यासाठी त्याने अडीच लाखाची सुपारी दिली.

हे सुद्धा वाचा

अनिलने वडिलांच्या सर्व दिनचर्येची माहिती आरोपींना दिली. घटनेच्या रात्री फोन करुन आरोपींना लोकेशनही सांगितले. त्यानंतर आरोपींनी पिकअप वाहनाने टक्कर मारत हत्या केली.

अशी उघड झाली घटना

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरु केला. तपासादरम्यान पोलिसांनी मयताच्या घरच्यांचीही चौकशी केली. चौकशीदरम्यान पोलिसांना अनिलवर संशय आला. यानंतर पोलिसांनी याप्रकरणात सायबर टीमची मदत घेतली.

ज्या ठिकाणी छगनचा अपघात झाला होता, तेथील परिसरात सर्व सीसीटीव्ही तपासले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना महत्वाचे पुरावे सापडले. यानंतर पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेत कसून चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.

वडिलांची विम्याची रक्कम हडपण्यासाठी त्यांची हत्या केल्याची कबुली अनिलने दिली. यानंतर पोलिसांनी अनिल पवार, देवेंद्र शिंदे आणि मंसाराम शिंदे यांना अटक केली आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.