वडील सुनेच्या नावे फ्लॅट खरेदी करत होते, मुलगा नाराज झाला मग…

वडिलांना मारण्यासाठी मुलाने दोन आरोपींना एक कोटी रुपये रक्कम, एक फ्लॅट आणि एक कार देण्याचे आश्वासन दिले होते. यापैकी एक लाख रुपये त्याने अॅडव्हान्स दिला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

वडील सुनेच्या नावे फ्लॅट खरेदी करत होते, मुलगा नाराज झाला मग...
स्कूल व्हॅनच्या मागच्या चाकाखाली आल्याने चिमुकलीचा मृत्यूImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 28, 2023 | 8:07 PM

बंगळुरू : बंगळुरूमध्ये मालमत्तेच्या वादातून एका तरुणाने वडिलांची सुपारी देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एन मणिकांत असे आरोपी मुलाचे नाव असून, तो बेरोजगार आहे. वडिलांना मारण्यासाठी त्याने दोन मारेकऱ्यांना 1 कोटी रुपयांचे कंत्राट दिले. नारायण स्वामी असे मयत वडिलांचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी मुलासह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. आदर्श टी, शिवकुमार एनएम अशी अन्य दोन आरोपींची नावे आहेत. मराठाहळ्ळीच्या कावेरप्पा ब्लॉकमध्ये ही धक्कादायक घटना घडली.

पोलिसात जाऊन वडिलांच्या हत्येची तक्रार दिली

वडिलांची हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतः पोलिसात हत्येची तक्रार दिली. आपल्यासमोर दोन जणांनी वडिलांची हत्या केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. याप्रकरणी मराठहळ्ळी पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. हत्येचा तपास सुरु केला असता पोलिसांना आरोपीवर संशय आला. त्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी केली असता मुलाने वडिलांची सुपारी देऊन हत्या केल्याचे उघड झाले.

वडिलांना मारण्यासाठी एक कोटीची सुपारी

वडिलांना मारण्यासाठी मुलाने दोन आरोपींना एक कोटी रुपये रक्कम, एक फ्लॅट आणि एक कार देण्याचे आश्वासन दिले होते. यापैकी एक लाख रुपये त्याने अॅडव्हान्स दिला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

हे सुद्धा वाचा

मणिकांत याने 2013 मध्ये पहिल्या पत्नीची हत्या केली होती. याप्रकरणी त्याला सात वर्षे तुरुंगवासाची शिक्षाही झाली होती. यानंतर 2020 मध्ये त्याची तुरुंगातून सुटका झाली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने दुसरे लग्न केले. दोघांना एक मुलगाही आहे. मात्र दुसऱ्या पत्नीशीही त्याचे जमत नव्हते. दोघांमध्ये वाद होऊ लागल्याने पत्नी त्याच्यापासून वेगळी रहायला गेली.

वडिलांनी पत्नीच्या नावे फ्लॅट घेण्याचा निर्णय पचनी पडला नाही

यानंतर मणिकांतच्या वडिलांनी सुनेच्या नावे फ्लॅट घेण्याचा निर्णय घेतला. मणिकांतला मात्र हे मान्य नव्हते. यामुळे त्याचा संताप झाला आणि त्याने आई-वडिलांना संपवण्याचा निर्णय घेतला. तुरुंगात असताना मणिकांतची शिवकुमार आणि आदर्श यांच्याशी भेट झाली होती. या दोघांना एक कोटी रक्कम, फ्लॅट आणि कारचे आमिष दाखवत त्याने वडिलांना मारण्याची सुपारी दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली. मणिकांतला चार बहिणीही आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.