Amravati Crime : पाच दिवस मुलीशी संपर्क होत नव्हता, वडील पहायला घरी आले दुर्गंधी पसरली होती, आत पाहिले तर…

मुलीशी संपर्क होत नसल्याने वडील मुलीच्या घरी तिला भैटायला आले. घराजवळ आले घर बंद होते, पण आतून दुर्गंधी येत होती. वडिलांनी पोलिसांसह आत जाऊन पाहिले अन् धक्काच बसला.

Amravati Crime : पाच दिवस मुलीशी संपर्क होत नव्हता, वडील पहायला घरी आले दुर्गंधी पसरली होती, आत पाहिले तर...
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने मुलाकडून आई आणि भावाची हत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Sep 02, 2023 | 10:06 AM

अमरावती / 2 सप्टेंबर 2023 : अमरावतीत एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. प्रेमसंबंधाला विरोध करत होती म्हणून मुलानेच आई आणि लहान भावाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हत्या करुन मृतदेह दिवाणमध्ये लपवून ठेवण्यात आले होते. नीलिमा कापसे आणि आयुष कापसे अशी मयत माय-लेकाची नावं आहेत. अमरावतीच्या मोर्शी येथे शिवाजी नगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी मोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मुलगा फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सौरभ कापसे असे आरोपी मुलाचे नाव आहे. या दुहेरी हत्याकांडाने मोर्शी शहर हादरलं.

काय आहे प्रकरण?

सौरभ याचे वडील वारले आहेत. यामुळे आईनेच त्याचा आणि लहान भावाचा सांभाळ केला. सौरभचे एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध सुरु होते. मात्र त्याच्या आईला हे प्रेमसंबंध मान्य नव्हते. यावरुन दररोज घरी वाद होत असत. अखेर हा वाद विकोपाला गेला आणि सौरभने आई आणि लहान भावाची हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपीने दोन्ही मृतदेह घरातील दिवाणमध्ये टाकून दाराला कुलूप लावून फरार झाला.

वडील पहायला आले असता घटना उघड

आईचे वडील पाच दिवसांपासून आपल्या मुलीला फोन लावत होते. मात्र तिचा फोन लागत नव्हता. यामुळे अखेर वडील मुलीला भेटायला तिच्या घरी आले. घराजवळ येताच आतून दुर्गंधी येत होती. यामुळे मोर्शी पोलिसांनी बोलावण्यात आले. पोलिसांनी दरवाजा खोलून आत प्रवेश केला. आतील दृश्य पाहून वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. मुलगी आणि नातवाचा मृतदेह दिवाणमध्ये पडला होता.

हे सुद्धा वाचा

चौकशी केली असता मोठ्या मुलाच्या प्रेमसंबंधांची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच पाच दिवसापासून मोठा मुलगा फरारही आहे. तसेच मुलाची गुन्हेगारी पार्श्वभूमहीही आहे. याआधी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. यावरुन मुलानेच आई आणि भावाची हत्या केल्याचा संशय अधिक बळावला आहे. पोलीस फरार मुलाचा शोध घेत आहेत.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.