पाटलाच्या पोराची मैत्रिणींनी चेष्टा केली, ‘जिजा’ रडले, नववधूच्या संतापाचे भर मंडपात वादळ
बिहारमधील सारण गावात ही घटना घडली. कोपा पाटील गावचे रहिवासी मोतीलाल यांचा मुलगा प्रशांत याचे लग्न सारण गावातील एका मुलीशी ठरले. लग्न सराई सुरु झाली. प्रथेनुसार मुलीच्या वडिलांनी मुलाला हुंडा दिला. अखेर लग्न दिवस उजाडला.
बिहार : लग्न मंडप सजला होता. वधू मंडळींनी लग्नाच्या मिरवणुकीचे जोरदार स्वागत केले. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. हळूहळू लग्न विधी होत होते. वरमाला समारंभ संपन्न झाला. नववधूच्या मैत्रिणींना नवरदेवाची चेष्टा, मस्करी करण्याची लहर आली. त्यांनी मंडपातच आपल्या जिजूची थोडीशी चेष्टा, मस्करी केली. पण, त्यांची मस्करी त्याला सहन झाली नाही. भर मंडपात नवरदेव रडू लागला. त्याला रडताना पाहून नववधूच्या संतापाचा पारा चढला. तिने अधिक चौकशी केली. तेव्हा तिला जे काही कळले त्यामुळे तिचा संताप अधिकच वाढला. तिच्या संतापाचे वादळ भर लग्न मंडपात घोंगावू लागले. अखेर, तिने कठोर निर्णय घेतला.
बिहारमधील सारण गावात ही घटना घडली. कोपा पाटील गावचे रहिवासी मोतीलाल यांचा मुलगा प्रशांत याचे लग्न सारण गावातील एका मुलीशी ठरले. लग्न सराई सुरु झाली. प्रथेनुसार मुलीच्या वडिलांनी मुलाला हुंडा दिला. अखेर लग्न दिवस उजाडला. मिरवणूक घेऊन वर मंडळी वधूच्या गावात पोहोचली. अत्यंत आदराने त्यांची सरबराई झाली.
लग्न मंडपात एक एक लग्न विधी संपन्न होत होत्या. पण, वधूच्या काही मैत्रिणी या लग्न आल्या होत्या. त्यांना प्रशांत यांच्यात काही दोष असल्याचे जाणवले. त्यानं आलेल्या संशयाची पडताळणी करण्यासाठी त्या मैत्रिणींनी वराची चौकशी सुरू केली. जसजसे लग्नाचे विधी पार पडत होते तसतसा त्यांचा वरावरील संशय अधिकच दाट होत होता.
दरम्यान, वरमाला समारंभ पार पडला. या सभारंभानंतर मैत्रिणींनी प्रशांतची मस्करी करायला सुरवात केली. आपल्या संशय खरा की खोटा याची खातरजमा त्यांना करायची होती. पण, त्यांनी वराशी मस्करी करायला सुरवात केली आणि काही वेळातच नवरदेव प्रशांत मंडपातच रडू लागला.
प्रशांत मंडपातच रडू लागल्यामुळे मैत्रिणींच्या संशय अधिकच गडद झाला. झाला प्रकार पाहून वधू काही काळ गोंधळली. पण, तिच्या मैत्रिणींनी प्रशांत हा गतीमंद असल्याचे सांगताच तिचा संताप वाढला.
संतप्त वधूने तोडले लग्न
थोड्या मस्करीमुळे घाबरलेल्या प्रशांतला असे रडताना पाहून वधूला राग आला. तिने लग्नास नकार दिला. वराची मानसिक स्थिती ठीक नाही. त्यामुळे ती कोणत्याही परिस्थितीत त्याच्याशी लग्न करणार नाही, असे तिने बजावले.
मुलगी आणि मुलामध्ये जोरदार वादावादी झाली
वधूच्या या घोषणेनंतर मंडपातील हशा आणि आनंदाचे वातावरण पूर्णपणे बदलले. नवरदेव आणि नववधू यांच्यात जोरदार वादावादी झाली. संपूर्ण वातावरण तणावपूर्ण बनले. मुलीच्या या निर्णयाची बातमी संपूर्ण गावात पसरली. त्यानंतर मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी जमा होऊ लागले.
वधू विना मिरवणूक परतली
गावातील वडिलधाऱ्यांनी वधूला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण, तिने कुणालाच जुमानले नाही. तर, मुलीच्या वडिलांनी हुंड्यात दिलेल्या वस्तू परत करण्यास सांगितल्याने परिस्थिती आणखीनच बिघडली. दरम्यान, गावातील जाणकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी करून वातावरण शांत केले. अखेर, लग्नसाठी आलेली मिरवणूक वधूला सोबत न घेताच परतली.