Prathyusha Suicide | वयाच्या 20 व्या वर्षी बॉयफ्रेण्डसोबत विषप्राशन, अशी झाली होती अभिनेत्री प्रत्युषाच्या आयुष्याची अखेर

2002 मध्ये तेलुगू अभिनेत्री प्रत्युषाने वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी आंध्र प्रदेशातील हैदराबादमध्ये आत्महत्या केली होती. लग्नाला घरच्यांनी विरोध केल्यामुळे तिने प्रियकरासोबत विष प्राशन केले होते

Prathyusha Suicide | वयाच्या 20 व्या वर्षी बॉयफ्रेण्डसोबत विषप्राशन, अशी झाली होती अभिनेत्री प्रत्युषाच्या आयुष्याची अखेर
South indian actress Pratyusha
Follow us
| Updated on: Jul 27, 2021 | 10:20 AM

मुंबई : मोठ्या पडद्यावर हॅपी गो लकी भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचं वैयक्तिक आयुष्य अत्यंत दुःखप्रद असल्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. यशाच्या शिखरावर असतानाच काही जणांनी मृत्यूला कवटाळलं. गुरुदत्तपासून जिया खान आणि परवीन बाबीपासून सुशांत सिंह राजपूत अशा अनेक जणांच्या आयुष्याची करुणाजनक आणि गूढ अखेर झाली. दाक्षिणात्य अभिनेत्री प्रत्युषानेही (Prathyusha) वैयक्तिक जीवनातील ताण तणावातून मृत्यूला जवळ केल्याचं बोललं जातं. 2002 मध्ये प्रत्युषाने आपल्या प्रियकरासोबत विषप्राशन केलं होतं. जवळपास वीस वर्ष जुन्या या घटनेबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कोण होती प्रत्युषा?

प्रत्युषा ही दक्षिणेतील मनोरंजन विश्वातील नवोदित तारका होती. तिचा जन्म 29 ऑगस्ट 1981 चा. 2000 मध्ये ‘टेलिव्हिजन स्टार’ स्पर्धेतून सर्वोत्कृष्ट हास्य हा किताब तिला मिळाला, आणि वयाच्या 19 व्या वर्षीच तिची तेलुगू सिनेसृष्टीत दणक्यात एण्ट्री झाली. दोन वर्षांतच तिचे अकरा चित्रपट प्रदर्शित झाले होते. कारकिर्दीच्या सुरुवातीलाच यश मिळत असल्याने ती खुश होती, मात्र खासगी आयुष्यात तिला अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे 2002 मध्ये प्रत्युषाने वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी आंध्र प्रदेशातील हैदराबादमध्ये आत्महत्या केली.

शीतपेयात विष मिसळून प्राशन

प्रत्युषाचं सिद्धार्थ रेड्डी नामक तरुणावर प्रेम होतं. दोघं रिलेशनशीपमध्ये होते. तिला सिद्धार्थसोबत विवाह करायचा होता, मात्र त्याच्या कुटुंबीयांना दोघांचं प्रेम मंजूर नव्हतं. घरच्यांच्या विरोधामुळे 23 फेब्रुवारी 2002 रोजी दोघांनी शीतपेयात विष मिसळून प्राशन केलं. यामध्ये प्रत्युषाचा मृत्यू झाला, परंतु सिद्धार्थ वाचला.

मृत्यूपूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याचा दावा

प्रत्युषाच्या मृत्यूनंतर मोठा गदारोळ झाला होता. तिच्या आत्महत्येला हत्या ठरवलं गेलं. फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये प्रत्युषाचा मृत्यू गळा दाबून झाल्याचं आधी सांगितलं गेलं. तसेच मृत्यूपूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याचंही ऑटोप्सी रिपोर्टमध्ये लिहिलं होतं. प्रत्युषाची आईही आपल्या मुलीची हत्या झाल्याच्या दाव्यावर ठाम होती.

सिद्धार्थला पाच वर्षांचा तुरुंगवास

एका अभिनेत्रीचा गूढ मृत्यू आंध्र प्रदेशच्या मनोरंजन आणि राजकीय जीवनाला ढवळून निघणारा ठरला. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने ही केस सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. सीबीआयने ऑटोप्सी रिपोर्टमधील दावे खोडून काढले. प्रत्युषाचा मृत्यू हा आत्महत्या असल्याचा निष्कर्ष सीबीआयने काढला. मात्र सिद्धार्थने तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा दावा सीबीआयने केला होता. त्यामुळे 2004 मध्ये कोर्टाने त्याला पाच वर्षांचा तुरुंगवास आणि सहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली होती.

संबंधित बातम्या :

प्रसिद्ध अभिनेत्री चित्राची आत्महत्या, वयाच्या 28 व्या वर्षी गळफास

मुलीची हत्या करुन मराठी अभिनेत्रीची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये गूढ उकललं

(South Indian actress Pratyusha who committed Suicide in early 2000s)

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.