EXCLUSIVE : सिनीअर PI डावलून API कडे CIU चं प्रमुखपदं कसं? सचिन वाझेंसाठी नियम पायदळी तुडवल्याचा आरोप

सचिन वाझे (Sachin Vaze) यांना महाविकास आघाडी सरकारकडून स्पेशल ट्रिटमेंट मिळतेय का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

EXCLUSIVE : सिनीअर PI डावलून API कडे CIU चं प्रमुखपदं कसं? सचिन वाझेंसाठी नियम पायदळी तुडवल्याचा आरोप
Sachin Vaze_CM Uddhav Thackeray
Follow us
| Updated on: Mar 11, 2021 | 3:45 PM

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात (Mansukh Hiren) मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक API सचिन वाझे (Sachin Vaze) हे संशयाच्या भोवऱ्यात आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन यांच्या पत्नीचा जबाब वाचून दाखवत, मनसुख हिरेन यांची हत्या सचिन वाझेंनी केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे सचिन वाझेंना तात्काळ अटक करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनीही रोखठोक भूमिका घेत, सचिन वाझे म्हणजे ओसामा बिन लादेन नाही, आधी फाशी आणि मग चौकशी ही तपासाची पद्धत नाही, आधी तपास होऊ द्या, दोषी असेल तर कारवाई होईल अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली. त्यामुळे मुख्यमंत्री सचिन वाझेंचा बचाव करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. (Special treatment for Sachin Vaze from Thackeray government what is truth)

अशाचवेळी सचिन वाझे यांना महाविकास आघाडी सरकारकडून स्पेशल ट्रिटमेंट मिळतेय का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण निलंबित झाल्यानंतर तब्बल 12 वर्षांनी सचिन वाझे मुंबई पोलीस दलात दाखल झाले. पोलीस दलात दाखल होताच, त्यांची नियुक्ती थेट क्राईम ब्रांचच्या गुप्तचर विभागाचे प्रमुखपदी करण्यात (Crime Intelligence Unit)आली.

सिनीअर पीआयला डावलून नियुक्ती?

मात्र आजवर या पदावर केवळ सिनीअर पीआय म्हणजेच वरिष्ठ पोलीस निरिक्षकांचीच नियुक्ती करण्यात आली होती. मात्र सचिन वाझे परत येताच पहिल्यांदाच या पदावर त्यापेक्षा खालच्या पोस्टचे म्हणजे API ची नियुक्ती करण्यात आली. API पेक्षा PI म्हणजेच पोलीस निरीक्षक आणि मग सिनीअर पीआय म्हणजे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असा वरिष्ठांचा क्रम आहे. मात्र सचिन वाझे यांनी PI आणि Sr. PI यांना ओव्हरटेक केल्याचा आरोप होत आहे.

एक तर 12 वर्षे पोलीस दलाच्या बाहेर, दुसरं म्हणजे ज्युनिअर असूनही क्राईम ब्रान्च गुप्तचर विभागाचे प्रमुख, असे सर्व नियम वाझेंसाठी पायदळी तुडवल्याचा आरोप होत आहे. सिनीअर पीआयपेक्षा खूप ज्युनिअर पद असूनही API ला क्राईम ब्रान्च गुप्तचर विभागाचे प्रमुख करणे योग्य नसल्याचा आरोप भाजपने केला आहे.

सचिन वाझे पुन्हा सेवेत घेतलं त्यावेळी गृहविभागाचं म्हणणं काय?

नव्वदच्या दशकातील ‘एन्काऊंटर स्पेशलिस्ट‘ अशी ख्याती असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे जवळपास दशकानंतर 9 जून 2020 रोजी पोलिस दलात परतले. सशस्त्र पोलीस दलातून वाझे यांची गुन्हे शाखेत नेमणूक करण्यात आली.

“महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 22 (न) चे पोट कलम (2) आणि त्याखालील सुधारित स्पष्टीकरणानुसार आयुक्त स्तरावरील पोलीस अस्थापना मंडळ यांना अपवादात्मक प्रकरणांमध्ये जनहितार्थ आणि प्रशासनिक निकडीनुसार सक्षम प्राधिकारी म्हणून प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन, पोलीस अस्थापना मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून जनहितार्थ विशेष बाब म्हणून प्रशासकीय कारणास्तव नेमणूक करण्यात येत आहे” असा उल्लेख बदलीच्या ऑर्डरमध्ये आहे.

सचिन वाझे यांच्यावर आरोप काय? 

उद्योगपती मुकेश अंबानी  (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला.   मनसुख हिरेन यांनी कळवा खाडीत आत्महत्या केल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे.  मात्र मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचा आरोप त्यांच्या पत्नी विमल हिरेन यांनी केला आहे.

ठाकरे सरकार सचिन वाझेंना वाचवतंय : देवेंद्र फडणवीस 

सचिन वाझे हे API आहेत. त्यांना वाचवण्यासाठी इतका फोर्स का लावताय?  सचिन वाझे हे सभागृहापेक्षा मोठे आहेत का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.  देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार 9 मार्चला मनसुख हिरेन यांच्या पत्नीचा जबाब भर सभागृहात वाचून दाखवला. त्यावरुन पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना अजूनही अटक का केलेली नाही, असा प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केला.

कोण आहेत सचिन वाझे?

नव्वदच्या दशकातील ‘एन्काऊंटर स्पेशलिस्ट‘ अशी ख्याती असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे जवळपास 16 वर्षांनंतर 2020 मध्ये पोलिस दलात परतले .

सचिन वाझे हे 1990 च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी 60 हून अधिक एन्काऊंटर केले आहेत. प्रदीप शर्मा अंधेरी सीआययूचे प्रमुख असताना त्यांच्या नेतृत्वात वाझे यांनी काम केलं आहे. सचिन वाझे यांच्यासह कॉन्स्टेबल राजेंद्र तिवारी, सुनील देसाई आणि राजाराम निकम यांनाही पुन्हा सेवेत रुजू करण्यात आले आहे.

मुंबईतील घाटकोपर बस बॉम्बस्फोटाचा आरोपी ख्वाजा युनूसचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्या प्रकरणी काही पोलिसांवर हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप होता. वाझेही या आरोपींपैकी एक होते. त्या प्रकरणात त्यांना 2004 मध्ये निलंबितही करण्यात आले होते. 2007 मध्ये त्यांनी राजीनामा दिला, मात्र तपास सुरु असल्याने तो मंजूर करण्यात आला नव्हता. त्यानंतर 2008 च्या दसरा मेळाव्यात ते शिवसेनेत दाखल झाले. (Sachin Vaze Reinstated in Crime Branch)

संबंधित बातम्या 

Mansukh Hiren death : भर सभागृहात चिरफाड, देवेंद्र फडणवीसांचा शब्द आणि शब्द, जसाच्या तसा!

Mansukh Hiren Death Case : मनसुख हिरेन, मोहन डेलकर, सचिन वाझे ते फडणवीसांना धमकी? विधानसभेत नेमकं काय घडलं?

(Special treatment for Sachin Vaze from Thackeray government what is truth)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.