भरधाव वेगातील कारने ठोकलं, टपावर आपटून जोडपं थेट रस्त्यावर आदळलं .. भयानक व्हिडीओ समोर !
अतिशय कमी वर्दळीच्या रस्त्यावरून जाणारी एक बाईक, त्यावर बसलेलं जोडपं आणि तेवढ्यात भरधाव वेगाने मागून आलेली कार. समोर बाईक दिसत असूनही कारचालकाने ब्रेक वगैरे न लावता गाडी तशीच पुढे दामटली आणि त्या बाईकला थेट धडक दिली
पुण्यातील कल्याणीनगरमधील थरारक अपघात असो किंवा वरळीत पहाटे घडलेलं हिट अँड रन प्रकरण… भरधाव वेगाने कार चालवत माणसांना किड्या-मुंगीसारखं चिरडणारे हे अपघात पाहून काळजाचा थरकाप उडतो. या घटना आणि त्यावरून उठलेला गदारोळ अद्यापही शमलेला नाही, त्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत. मात्र हे अपघात ताजे असतानाच काल नगर-कल्याण महामार्गावर असाच एक अपघात घडला. भीषण… हा शब्दही कमी पडेल अशी त्या अपघाताची दृश्य होती.
अतिशय कमी वर्दळीच्या रस्त्यावरून जाणारी एक बाईक, त्यावर बसलेलं जोडपं आणि तेवढ्यात भरधाव वेगाने मागून आलेली कार. समोर बाईक दिसत असूनही कारचालकाने ब्रेक वगैरे न लावता गाडी तशीच पुढे दामटली आणि त्या बाईकला थेट धडक दिली. ती ठोकर एवढी जबरदस्त होती की, बाईकवरील दोघेही एखाद्या बाहुलीप्रमाणे वर उडाले, गाडीच्या टपावर आपटले आणि धाडकन रस्त्यावर आदळले. त्याचं दैवं बलवत्तर म्हणूनच या भीषण अपघातातून ते बचावले असले तरी बऱ्याच जखमा झाल्या आहेत . काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या अपघाताचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
अपघाताचा व्हिडीओ समोर
नगर कल्याण महामार्गावरील पिंपरी पेंढार येथे दुपारच्या सुमारास, कमी वर्दळीच्या वेळेस हा अपघात झाला. त्याच परिसरातील एका सीसीटीव्हीमध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली. ते दृश्य पाहिलं तर कोणाच्याही मनात धडकीच भरेल. मात्र सुदैव असं की एवढा मोठा अपघात होऊनही बाईकवरू उ़डून खाली आदळलेलं ते जोडपं बचावलं. त्यांना आळेफाटा येथील खाजगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले आहे. या अपघाताप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून धडक देणारी ती कार कोणाची होती, त्याचा मालक कोण याचा पोलिस शोध घेत आहेत.
नगर कल्याण महामार्गावरील पिंपरी पेंढार येथे दुपारच्या सुमारास भरधाव वेगातील कारने बाईकला ठोकलं. त्यामुळे बाईकवरील पती-पत्नी बाहुलीसारखे हवेत उडून आधी टपावर आपटले नंतर रस्त्यावर आदळले. त्यांना आळेफाटा येथील खाजगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले आहे.
मात्र या कारची जबरदस्त धडक पाहून रस्त्यावर वाहने चालवताना होणाऱ्या आपण काळजी घेण्याची गरज देखील लक्षात येत आहे. दिवसेंदिवस वाढणारे अपघात यामुळे रस्त्यावर वाहन चालवताना सावधानता बाळगणं अत्यंत गरजेचं आहे, असे आवाहन पोलिसांनी केलं आहे.
अंत्यसंस्कार करुन परतणाऱ्यांना ट्रकने चिरडलं, नगर-कल्याण महामार्गावर काळाचा घाला
कालच नगर कल्याण महामार्गावर एक मोठा अपघात झाला होता. एक भरधाव वेगाने येणारा ट्रक रस्ता सोडून अंत्यविधीवरुन परतणाऱ्या लोकांमध्ये घुसला आणि अनेकांना चिरडलं. या अपघातात पाच जण ठार झाले तर अनेक गंभीर जखमी होते. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश होता. . जुन्नर तालुक्यात गुळंचवाडी शिवारात ही घटना घडली.