Latur Bus Accident : समोरील वाहनाला साईड देताना चालकाचा ताबा सुटला अन्…

लातूर डेपोची ही बस पुणे-वल्लभनगरकडे आज सकाळी निघाली होती. बोरगावकाळे जवळ आल्यानंतर अरुंद रस्त्यावर पुढून येणाऱ्या वाहनाला साईड देताना चालकाचा ताबा सुटला.

Latur Bus Accident : समोरील वाहनाला साईड देताना चालकाचा ताबा सुटला अन्...
लातूरमध्ये चालकाचा ताबा सुटल्याने बसला अपघातImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jan 17, 2023 | 8:44 PM

लातूर : समोरुन येणाऱ्या वाहनाला साईड देताना लातूर-पुणे एसटी बस मुरुड जवळच्या बोरगावकाळे येथे पुलावरुन खाली कोसळल्याची घटना आज सकाळी घडली. एसटी चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने बस पुलाखाली जात उलटली. आज सकाळी दहाच्या सुमारास हा एसटी अपघात घडला आहे. या अपघातात एसटीमधील 30 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी 14 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना लातुरच्या शासकीय रुग्णालयात तातडीने हलवण्यात आले आहे. काही जखमी प्रवाशांवर मुरुड येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. लातूर-मुरुड हा रस्ता अरुंद आहे. त्यामुळे या रस्त्यावर अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

लातूरहून पुण्याला चालली होती एसटी

लातूर डेपोची ही बस पुणे-वल्लभनगरकडे आज सकाळी निघाली होती. बोरगावकाळे जवळ आल्यानंतर अरुंद रस्त्यावर पुढून येणाऱ्या वाहनाला साईड देताना चालकाचा ताबा सुटला. नेमकं याचवेळी स्टेअरिंग रॉड देखील तुटल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे बस रस्त्याखाली जाऊन उलटली.

अपघातात बसचालकही गंभीर जखमी

या अपघातात बसचेही मोठे नुकसान झाले आहे. बसचा चालक देखील गंभीर जखमी झाला आहे. जखमींमध्ये महिला आणि वृद्ध प्रवाशांचाही समावेश आहे. दुपारनंतर घटनास्थळावरून एसटी हटविण्यात आली.

हे सुद्धा वाचा

अपघातामुळे दीड तास वाहतुकीचा खोळंबा

बस हटविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले आहेत. या अपघातामुळे साधारण दीड तास वाहतूक थांबविण्यात आली होती. सहा अॅम्बुलन्सद्वारे जखमींना लातुरच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर किरकोळ जखमींवर मुरुड आणि ढोकी येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.

हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये एसटीचे मोठे नुकसान झाले आहे. लातूर-मुरुड रस्ता हा अरुंद असल्याने नेहमीच अपघात होत असतात. या अपघाताने रस्ता रुंदीकरणाची मागणी पुन्हा एकदा पुढे आली आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.