राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तीन ठिकाणी छापेमारी; बनावट विदेशी मद्याचा मोठा साठा जप्त, तीन जणांना अटक
ठाणे -बेलापूर रोडवर (Thane-Belapur road) बनावट विदेशी मद्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क (State Excise Department) ठाणे आणि राज्य उत्पादन शुल्क नवी मुंबईच्या (new mumbai) संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे.
ठाणे : ठाणे -बेलापूर रोडवर (Thane-Belapur road) बनावट विदेशी मद्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क (State Excise Department) ठाणे आणि राज्य उत्पादन शुल्क नवी मुंबईच्या (new mumbai) संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल 14 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाला गुप्त माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने ठाणे- बेलापूर रोडवर सापळा रचला. त्याचवेळी त्यांना समोरून एमएच 02 बीक्यू 8083 नंबरचे एक वाहन येताना दिसते. त्यांनी या वाहनाची तपासणी केली असात, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट विदेशी मद्याचा साठा आढळून आला. या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असून, नील वाघेला, उमेश दुबे आणि साहिल चौहान अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
तीन ठिकाणी छापेमारी
पोलिसांनी आरोपीला अटक करून त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आणखी तीन ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. या छापेमारीत पहिल्या ठिकाणावरून एक हजार मलिलीटरच्या 5 बनावट स्कॉच मद्याच्या सीलबंद बाटल्या, 1 हजार मिलिलीटरच्या विविध ब्रँडच्या 50 रिकाम्या बाटल्या व दोन मोबाईल आढळून आले आहेत. तर दुसऱ्या ठिकाणावरून 1 हजार मिलिलीटरच्या 48 कॅन तसेच विविध ब्रॅंडच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. तर तिसऱ्या ठिकाणावरून एक पांढऱ्या रंगाची दुचाकी आणि विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. या छाप्यांमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जवळपास 14 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपींची चौकशी
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत तीन ठिकाणी छापा टाकण्यात आला आहे. या छाप्यामध्ये लाखो रुपयांचा बनावट विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आला असून, आरोपींकडून आणखी काही माहिती मिळते का? याचा तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
संबंधित बातम्या
विक्की नगराळेला फाशीची शिक्षा का नाही? उज्वल निकमांनी कारण सांगितलं, पुन्हा कोर्टात खटला जाणार?