घरचा अभ्यास केला नाही म्हणून शिक्षकाचे विद्यार्थ्यासोबत तालिबानी कृत्य, वाचा काय घडले?

शाळा व्यवस्थापन पीडित महिलेला सतत धमकावत असल्याने पीडितेने पोलीस आयुक्त बीपी जोगदंड यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार करत न्यायाची मागणी केली आहे.

घरचा अभ्यास केला नाही म्हणून शिक्षकाचे विद्यार्थ्यासोबत तालिबानी कृत्य, वाचा काय घडले?
उत्तर प्रदेशात शिक्षकाकडून विद्यार्थ्याला मारहाणImage Credit source: google
Follow us
| Updated on: Nov 14, 2022 | 8:59 PM

कानपूर : घरचा अभ्यास केला नाही म्हणून शिक्षकाने तिसरीच्या विद्यार्थ्याला मारहाण करत केस उपटल्याची घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये उघडकीस आली आहे. उपटलेले केस मुलाच्या हातात देत घरी जाऊन आई-वडिलांना दाखवण्यास सांगितले. कानपूरमधील पनकी रतनपूर येथील पंचमुखी विद्यालयात 5 नोव्हेंबर रोजी ही संतापजनक घटना घडली आहे. पवन ढाका असे मारहाण करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. मुलाची आई जेव्हा शाळेत तक्रार करण्यासाठी गेली तेव्हा शाळेच्या व्यवस्थापनानेही महिलेशी गैरवर्तन केले आणि तिला शिवीगाळ करून धमकावले.

रतनपूर दुडा कॉलनीतील पंचमुखी विद्यालयाचे व्यवस्थापक अरुण कटिहार यांच्यावर आरोप करताना एका दलित महिलेने सांगितले की, महिला मुलासह पंकी पोलीस ठाण्यात पोहोचली तेव्हा पोलिसांनी ऐकून घेण्याऐवजी 151 ची कारवाई केली.

पीडित कुटुंबाला शाळा व्यवस्थापनाकडून धमक्या

दुडा कॉलनीत राहणारे मजूर अजय गौतम यांचा मुलगा आरव हा पंचमुखी विद्यालयात तिसरी इयत्तेत शिकतो. शिक्षकाने मारहाण केल्यानंतर तो इतका घाबरला होता की, त्याला काहीच बोलता येत नव्हते. आरवच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, त्यांना शाळा व्यवस्थापनाकडून सतत धमक्या दिल्या जात आहेत.

हे सुद्धा वाचा

पीडित कुटुंबाची न्यायाची मागणी

शाळा व्यवस्थापन पीडित महिलेला सतत धमकावत असल्याने पीडितेने पोलीस आयुक्त बीपी जोगदंड यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार करत न्यायाची मागणी केली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांना एससी-एसटी आणि इतर कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या.

शाळा व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल

संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अधिकाऱ्यांनी दोषींवर कारवाई करण्यास सांगितले असून, शाळा व्यवस्थापनाविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हाही दाखल केला आहे. मात्र अद्याप शिक्षण विभागाच्या एकाही जबाबदार अधिकाऱ्याने मुलावर झालेल्या हल्ल्याची दखल घेतली नाही किंवा चौकशीची तसदी घेतली नाही.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.