शिक्षकाने दुसरीच्या विद्यार्थ्याला लाथा घातल्या, डोकं जमिनीवर आपटले; कारण ऐकून अवाक् व्हाल
शिक्षकाने मुलाचे डोके जमिनीवर आपटले आणि लाथा-बुक्क्या मारल्या. या मारहाणीत त्याच्या उजव्या डोळ्याला दुखापत झाली.
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बेदम मारहाणीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यापूर्वी आग्रा, फतेहपूर आणि श्रावस्ती जिल्ह्यात विद्यार्थ्यांना मारहाणीच्या घटना घडल्या होत्या. आता असाच एक प्रकार भदोहीमध्येही समोर आला आहे. येथे शिक्षका (Teacher)ने सात वर्षांच्या दलित विद्यार्थ्या (Student)ला बेदम मारहाण (Beating) केली. आरोपी शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण शहरातील कोईरौना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरकारी प्राथमिक शाळेतील आहे.
शिक्षकाच्या मारहाणीत विद्यार्थ्याच्या उजव्या डोळ्याला दुखापत
मंगळवारी दुपारी इयत्ता दुसरीचा विद्यार्थी शाळेच्या मैदानात खेळत होता. यावेळी तेथील शिक्षकाने त्याला काही कारणावरुन ओरडायला सुरुवात केली. ओरडता ओरडता शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. शिक्षकाने मुलाचे डोके जमिनीवर आपटले आणि लाथा-बुक्क्या मारल्या. या मारहाणीत त्याच्या उजव्या डोळ्याला दुखापत झाली. याप्रकरणी मुलाचे काका छोटे लाल यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
सहायक प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून तपास सुरु
सहाय्यक मूलभूत शिक्षण अधिकारी (डीघ ब्लॉक) फरहा रईस यांनी सांगितले की, दलित विद्यार्थ्याला मारहाण करण्याच्या घटनेची दखल घेण्यात आली आहे. संबंधित शिक्षकाला नोटीस देऊन स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. फराह रईसने सांगितले की, ते स्वत: या प्रकरणाची चौकशी करत असून योग्य ती कारवाई केली जाईल.
याआधी फतेहपूरमध्ये घडला होता विद्यार्थ्याला मारहाणीचा प्रकार
याआधी यूपीच्या फतेहपूर जिल्ह्यात प्राथमिक शाळेतील शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. या मारहाणीत पाचवीच्या विद्यार्थ्याचा हात तुटला होता. मुलाचा हात तोडल्यानंतर कुटुंबीय शाळेत पोहोचले असता शिक्षकाने त्यांच्याशीही गैरवर्तन केले.