शाळेच्या छतावरुन पडून झाला विद्यार्थीनीचा मृत्यू, शिक्षकांनी गॅंगरेप केल्याचा वडीलांचा आरोप

शाळेच्या छतावरुन पडून दहावीच्या विद्यार्थीनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने पालकांनी आपल्या मुलीवर अत्याचार करून तिला छतावरुन फेकल्याचा आरोप केला आहे.

शाळेच्या छतावरुन पडून झाला विद्यार्थीनीचा मृत्यू, शिक्षकांनी गॅंगरेप केल्याचा वडीलांचा आरोप
Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: May 28, 2023 | 1:41 PM

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील अयोध्या येथे एका खाजगी शाळेत छतावरून पडल्याने दहावीच्या विद्यार्थीनीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या मूलीच्या पित्याने छतावरुन आपल्या मुलीला फेकण्याआधी तिच्यावर गॅंगरेप करण्यात आल्याचा आरोप केला आहे. पोलीसांनी शाळेचे प्रिन्सिपल आणि क्रीडा शिक्षकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. याआधी ही विद्यार्थीनी झोपाळ्यावरून पडल्याचा दावा शाळा प्रशासनाने केला होता. तसेच शाळेचे अनेक सीसीटीव्ही बंद असल्याचेही तपासात उघडकीस आले आहे.

कॅट कोतवाली भागातील पलिया शाहबदी जवळील सनबीम स्कूलमध्ये शुक्रवारी शाळेच्या छतावरून पडून दहावीच्या विद्यार्थीनीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात मुलीच्या वडीलांनी आपल्या मुलीवर सामुहीक अत्याचार करण्यात आला. त्यानंतर हे पाप लपविण्यासाठी तिला छतावरून ढकलण्यात आल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात शाळेचे व्यवस्थापक, प्राचार्य आणि क्रीडा शिक्षकावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच क्रीडा शिक्षकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली जात आहे.

शाळा बंद असताना बोलावले

शुक्रवारी प्राचार्यांनी सकाळी नऊ वाजता शाळेत बोलाविल्याने ही दहावीची विद्यार्थीनी गेली होती. अन्य विद्यार्थ्यांनाही बोलावले होते. सकाळी 9.39 वाजता ती छतावरून कोसळल्याचे म्हटले जात आहे. तिला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले गेले. तिथे तिचा मृत्यू झाला. पालकांनी आता आरोप करताना शुक्रवारी शाळेला सुट्टी असूनही प्राचार्य रश्मी भाटीया यांनी आपल्या मुलीला शाळेत बोलावले. तेथे आधीच हजर असलेल्या व्यवस्थापक बृजेश यादव आणि क्रीडा शिक्षक अभिषेक कनोजीया यांनी तिच्यावर सामुहीक अत्याचार केला आणि यातून सुटण्यासाठी तिला छतावरुन फेकल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

तीन सदस्यीय वैद्यकीय पॅनल

या प्रकरणात पालकांच्या तक्रारीवरून व्यवस्थापक बृजेश यादव, प्राचार्या रश्मी भाटीया आणि क्रीडा शिक्षक अभिषेक कनोजीया याच्या वर सामुहिक बलात्कार, हत्या, पॉक्सो कायदा, पुरावे नष्ट केल्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला. या प्रकरणात शनिवारी कडेकोट बंदोबस्तात जिल्हाधिकाऱ्याच्या निर्देशात तीन सदस्यीय वैद्यकीय पॅनलने या मुलीच्या पार्थिवाचे पोस्टमार्टेम केले. यावेळी संपूर्ण घटनाक्रमाचे चित्रीकरण करण्यात आले. त्यानंतर दुपारी 2.30 वा. या मुलीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या मुलीचा अति उंचावरून पडल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.