Latur : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीचा आत्महत्येचा प्रयत्न, मैत्रिणींमुळे वाचला जीव
येथील शासकीय वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थीनीने महाविद्यालयाच्या वसतीगृहातच गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी दुपारी ही घटना घडली असून संबंधित मुलीच्या मैत्रिणींमुळेच तिचा जीव वाचला आहे. मात्र, यामध्ये सदरील विद्यार्थीनी ही बेशुध्द झाली होती. वसतीगृहात गळफास घेतल्यानंतर या विद्यार्थीनीला बेशुध्द अवस्थेतच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
लातूर : येथील शासकीय (Medical Education) वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका (Student) विद्यार्थीनीने महाविद्यालयाच्या वसतीगृहातच गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी दुपारी ही घटना घडली असून संबंधित मुलीच्या मैत्रिणींमुळेच तिचा जीव वाचला आहे. मात्र, यामध्ये सदरील विद्यार्थीनी ही बेशुध्द झाली होती. (Latur) वसतीगृहात गळफास घेतल्यानंतर या विद्यार्थीनीला बेशुध्द अवस्थेतच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून ती अभ्यासाच्या ताणतणावात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
मैत्रिणींची तत्परता आली कामी
मूळची कर्नाटकातली असलेली मुलगी ही आपल्या मैत्रिणींसोबत महाविद्यालयाच्या वसतीगृहात राहत आहे. नेहमीप्रमाणे या तिघी मंगळवारी दुपारी जेवणासाठी वसतीगृहाबाहेर पडल्या होत्या. मात्र, जेवणासाठी जात असतानाच सदरील मुलीने खोलीमध्ये पाण्याची बॉटल राहिल्याचे सांगत पुन्हा खोलीत गेली. पण बऱ्याच वेळानंतरही ती परत येत नसल्याने तिच्या मैत्रिणी खोलीकडे गेल्या पण ती आतून दरवाजाच उघडत नव्हती. दार, कडी वाजवूनही प्रतिसाद मिळत नसल्याने या मैत्रिणींनी आरडाओरड केली. दरम्यान, वसतीगृहातील कर्मचाऱ्यांनी धाव घेतली आणि खोलीचा दरवाजा तोडला. तेव्हा सदरील मुलगी ही बेशुध्द अवस्थेत होती. कर्मचाऱ्यांनी लागलीच तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरु आहेत.
परराज्यातील मूलगी, शिक्षणासाठी लातुरात
महाविद्यालयाच्या वसतीगृहात आत्महत्येचा प्रयत्न करणारी 24 वर्षीय विद्यार्थिनी ही मूळची कर्नाटकातील आहे. गेल्या काही दिवसांपासून ती वैद्यकीय शिक्षणासाठी लातुरातच राहत आहे. सोबत तिच्या 3 मैत्रिणी असून सोमवारी दुपारी तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. अभ्यासाला घेऊन ती गेल्या काही दिवसांपासून तणावात असल्याचे गांधी चौक पोलिस ठाण्याचे पेलिस निरिक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांनी सांगितले. मात्र, याबाबत पोलिसांमध्ये कुठल्याही प्रकारची नोंद नाही.
संबंधित बातम्या :
Jeweler Robbery CCTV | पुण्यात कोयत्याच्या धाकाने सराफाची लूट, 73 हजारांच्या सोनसाखळ्यांची चोरी