इतकं कुणी मारतं का?, सिगारेट ओढली म्हणून शिक्षकाने त्याला… शिक्षक आहे की हैवान ?

त्या विद्यार्थ्याच्या अशा दशेमुळे कुटुंबियांची हालत खराब झाली असून ते सगळेच धक्क्यात आहेत. आरोपी शिक्षका विरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

इतकं कुणी मारतं का?, सिगारेट ओढली म्हणून शिक्षकाने त्याला... शिक्षक आहे की हैवान ?
क्षुल्लक कारणातून दोन कुटुंबात हाणामारी
Follow us
| Updated on: Jun 26, 2023 | 1:46 PM

पाटणा : बिहारच्या पूर्व चंपारण (East Champaran) येथे एका शिक्षकाने अमानुष वागणुकीचा कळस गाठला आहे. त्या शिक्षकाने एका विद्यार्थ्याला एवढी मारहाण केली की ती त्याच्या जीवावरच बेतली. मात्र त्याने हे कृत्य का केले, हे जाणून तर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. पीडित विद्यार्थी सिगारेट ओढत होता, ते पाहिल्याने शिक्षकाने त्याला मारल्याचे समोर आले आहे.

बजरंगी कुमार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

नक्की काय झालं ?

बजरंगी हा ज्या शाळेत शिकत होता, आरोपी शिक्षक विजय, हे त्याच शाळेचे चेअरमन असल्याचे समजते. ही शाळा मधुबन ठाणे क्षेत्रातील हरदिया पुलाजवळ असून दोन महिन्यांपूर्वीच बजरंगीने शाळेत ॲडमिशन घेतली होती. दरम्यान या घटनेनंतर शाळेला टाळं ठोकून चेअरमन फरार झाल्याचे समजते.

तो मोबाईल दुरूस्त करण्यासाठी गेला होता

मिळालेल्या माहितीनुसार, आईचा मोबाईल खराब झाल्यामुळे तो दुरूस्त करण्यासाठी बजरंगी बाहेर पडला होता. मोबाईल दुकानात दिल्यानंतर तो हरदिया पुलाजवळ सिगारेट ओढण्यासाठी गेला होता असे समजते. मात्र तेव्हा शाळेच्या चेअरमननी त्याला सिगारेट ओढताना पाहिले आणि ते संतप्त झाले. बजरंगीला पकडून ते त्याला शाळेत घेऊन गेले.

तेथे त्यांनी त्याचे कपडे उतरवून त्याला बेल्टने बेदम मारहाण केली, असा आरोप बजरंगीच्या कुटुंबियांनी लावला आहे. या मारहाणीमुळे तो तेथेच बेशुद्ध झाला. या घटनेची माहिती मिळताच त्याला लगेचच खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची गंभीर परिस्थिती पाहून त्याला मुजफ्फरपूर येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले. दुर्दैवाने तेथे त्याचा मृत्यू झाला.

शोकग्रस्त मातेचे शिक्षकावर गंभीर आरोप

विजय यादव असे आरोपी शिक्षकाचे नाव असून मृत विद्यार्थी बजरंगीच्या कुटुंबियांनी शिक्षकावर हत्येचा आरोप लावला आहे. मृतय विद्यार्थ्याचे वडील मजदूर म्हणून काम करतात. बजरंगीच्या मृत्यूने त्याची आई शोकाकुल झाली असून तिने शिक्षकावर आरोप केले आहेत. माझ्या मुलाला शाळेत कधी नेले, मारहाणीनंतर रुग्णालयात कधी दाखल करण्यात आले, याबद्दल शाळेतर्फे आम्हाला काहीच कळवण्यात आले नाही, असा आरोपही तिने केला आहे.

मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.