नागपुरात चाललंय काय? आधी एकाच कुटुंबात तिघांची आत्महत्या-हत्या, आता प्रेमी जोडप्याची धावत्या रेल्वेखाली उडी
नागपुरात प्रेमीयुगुलाने धावत्या रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली. ही घटना नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीत घडली. 18 वर्षीय तरुण आणि 16 वर्षीय तरुणीने प्रेम प्रकरणातून ही आत्महत्या केल्याची माहिती आहे. दोघांनीही हातात हात घालून धावत्या रेल्वेखाली उडी मारली. दोघेही शहरातील जयभीम चौक ( Jaibhim Chowk) येथील रहिवासी आहेत. घरच्यांना दोघांच्या प्रेमाची कुणकुण लागली होती. विरोध असल्यानं उचलले आत्महत्येचे पाऊलं.
नागपूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याअंतर्गत (MIDC Police Station) पतीने अल्पवयीन मुलगी आणि पत्नीची हत्या केली. त्यानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेनंतर दुसरी धक्कादायक घटना उघडकीस आली. प्रेमीयुगुलाने धावत्या रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली ही दुसरी घटना नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीत घडली. 18 वर्षीय तरुण आणि 16 वर्षीय तरुणीने प्रेम प्रकरणातून (Prem Prakaran) ही आत्महत्या केल्याची माहिती आहे. दोघांनीही हातात हात घालून धावत्या रेल्वेखाली उडी मारली. दोघेही शहरातील जयभीम चौक ( Jaibhim Chowk) येथील रहिवासी आहेत. घरच्यांना दोघांच्या प्रेमाची कुणकुण लागली होती. विरोध असल्यानं उचलले आत्महत्येचे पाऊलं.
काय आहे प्रकरण?
दोघेही प्रेमीयुगुल हे कामठीतील जयभीमनगर भागात राहतात. ते अल्पवयीन आहेत. त्यांच्या प्रेमाची कुणकुण घरच्यांना लागली. एकमेकांशिवाय कसे राहणार आपण तर अल्पवयीन आहोत, असा प्रश्न त्यांना पडला. समाजात आपली बदनामी होईल, या भीतीनं त्यांनी हे आत्मघाती पाऊल उचलल्याची माहिती आहे. तरुण 18 वर्षांचा तर तरुणी 16 वर्षांची आहे. दोघेही घराबाहेर पडले. हातात हात घातला. त्यानंतर रेल्वेखाली उडी घेतली. सकाळी दोघांचेही मृतदेह सापडले.
पत्नी, मुलीची हत्या करून आत्महत्या
नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्या अंतर्गत अंगाचा थरकाप उडवणारा प्रसंग समोर आला आहे. पतीने अल्पवयीन मुलगी आणि पत्नीची हत्या केली. त्यानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. राजीवनगरातील तरोडा मोहल्ला परिसरात ही घटना घडली. पती विलास गवते याने 13 वर्षीय मुलगी आणि 45 वर्षीय पत्नी रंजना गवते यांचा खून केला. त्यानंतर स्वतःचेही आयुष्य संपविले. पत्नी आणि मुलीचा गळा कापला. त्यानंतर विलासने गळफास लावला. कौटुंबिक वादातून विलासने हे पाऊल उचलल्याची माहिती आहे.