Sukesh Chandrasekhar: जेलमध्ये मोबाईल फोन वापरण्यासाठी सुकेश तुरुंगाधिकाऱ्यांना महिन्याला दीड कोटींची लाच देत होता; 82 अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
महाठग सुकेश चंद्रशेखर याला जेलमध्ये सोई सुविधा पुरवल्या प्रकरणी रोहिणी तुरुंगाच्या 82 अधिकारी – कर्मचाऱ्यांविरोधात पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. महाठग सुकेश चंद्रशेखर याच्याकडून हे लोक दरमहा दीड कोटी रुपयांची लाच स्वीकारत होते, असे पोलिसांनी ‘एफआयआर’ मध्ये नमूद केले आहे.
दिल्ली : 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जेलमध्ये असलेल्या सुकेश चंद्रशेखरबाबत (Sukesh Chandrasekhar) आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जेलमध्ये स्वतंत्र बॅरेक आणि मोबाईल फोन वापरण्यासाठी सुकेश चंद्रशेखर तुरुंगाधिकाऱ्यांना दर महिन्याला दीड कोटी रुपयांची लाच देत होता. या प्रकरणी जेलमधील 82 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. सुकेशचे बॉलिवूड सेलिब्रिटींसोबतचे कनेक्शनही समोर आले होते. या प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांच्या नावानंतर आणखी अभिनेत्रींची नावे समोर आली होती. जेलमध्ये असताना सुकेशने जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांना महागडे गिफ्टस दिले होते. श्रद्धा कपूर आणि शिल्पा शेट्टीसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींशीही त्याचे संबंध असल्याची माहिती समोर आली होती.
महाठग सुकेश चंद्रशेखर याला जेलमध्ये सोई सुविधा पुरवल्या प्रकरणी रोहिणी तुरुंगाच्या 82 अधिकारी – कर्मचाऱ्यांविरोधात पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. महाठग सुकेश चंद्रशेखर याच्याकडून हे लोक दरमहा दीड कोटी रुपयांची लाच स्वीकारत होते, असे पोलिसांनी ‘एफआयआर’ मध्ये नमूद केले आहे.
रोहिणी कारागृहात असताना सुकेश दर महिन्याला अधिकाऱ्यांना स्वतंत्र बॅरेक आणि मोबाईल फोन वापरण्यासाठी दीड कोटी रुपयांची लाच देत असे. फोर्टिस हेल्थकेयरचे माजी प्रवर्तक शिवइंदर सिंग यांच्या पत्नी आदिती सिंग तसेच काही अन्य धनाढ्य लोकांची फसवणूक केल्याचा आरोप सुकेश चंद्रशेखर याच्यावर आहे. तब्बल 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात सुकेशचा सहभाग आहे. यातील आदिती सिंग यांचीच दोनशे कोटी रुपयांची फसवणूक झालेली आहे.
स्वतंत्र बरॅक, मोबाईलसह अन्य सुविधाही
तिहार तुरुंगातील कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन वर्षांत त्याच्याकडून सुमारे 12.5 कोटी रुपये गोळा केल्याचा आरोप केला जात आहे. सुकेशला वेगळे बरॅक उपलब्ध करून देणे, त्याला मोबाईल वापरण्याची मुभा देणे तसेच इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तुरुंगातूील अधिकारी आणि कर्मचारी लाच घेत असल्याचे उघडकीस आले असल्याचा पोलिसांचा दावा आहे.
सात कर्मचाऱ्यांना अटक
आरोपी सुकेश याला रोहिणीच्या तुरुंग क्रमांक 10 मधील एका खोलीत ठेवण्यात आले होते. सुकेशला वेगवेगळ्या प्रकारची मदत केल्याच्या आरोपावरून याआधीच सात तुरुंग कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे. तिहार तुरुंगात असताना सुकेशने आदिती सिंग यांची 200 कोटी रुपयांची फसवणूक केली होती. गृह मंत्रालयाचा अधिकारी असल्याचे सांगत आवाज बदलून त्याने शिवइंदर सिंग याना कायद्याच्या कचाट्यातून सोडविण्याचे आमिष दाखवत त्यांच्याकडून हे 200 कोटी उकळले होते. दरम्यान सुकेशच्या संदेशांची देवाणघेवाण करणाऱ्या नर्सिंग स्टाफविरोधातही लवकरच दिल्ली पोलिस कारवाई करणार असल्याचे समजते.
सुकेशने वयाच्या 17 व्या वर्षापासून गुन्हेगारी
सुकेश याने वयाच्या 17 व्या वर्षापासून गुन्हेगारीला सुरुवात केली. सुकेश हा उच्चभ्रू लोकांना फोन करायचा आणि स्वतःला मोठा सरकारी अधिकारी सांगायचा. 2007 मध्ये त्याने बंगळुरू डेव्हलपमेंट अथॉरिटीमध्ये नोकरी मिळवून देण्याच्या बदल्यात 100 हून अधिक लोकांना गंडा घातला होता.
52 लाखांचा घोडा, 9 लाखांची मांजर; सुकेशने जॅकलीनला दिले कोट्यवधींचे ‘गिफ्ट’
200 कोटी रुपयांची खंडणी वसुली प्रकरणात ईडीने कथित ठग सुकेश चंद्रशेखर, त्याची पत्नी अभिनेत्री लीना मारिया पॉल आणि अन्य 6 जणांविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणात 7000 पानांचे आरोपपत्र यापूर्वीच दाखल झाले आहे. या आरोपपत्रात महाठग सुकेश चंद्रशेखरने बॉलिवुड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि नोरा फतेहीला कोट्यवधी रुपयांचे गिफ्ट दिल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.सुकेशने जॅकलीनला 10 कोटींचे गिफ्ट दिले. यात 52 लाखांचा घोडा आणि 9 लाखांच्या फारशी मांजरीचाही उल्लेख करण्यात आला आहे. नोरा फतेहीलाही दिलेल्या कोट्यवधींच्या गिफ्टचा आरोपपत्रात उल्लेख आहे.महागड्या गिफ्ट्समध्ये दागिने, हिरेजडित दागिणे, क्रॉकरी, 4 फारशी मांजरी (एका मांजरीची किंमत जवळपास 9 लाख रुपये). याशिवाय लाखो रुपये किमतीच्या एका घोड्याचाही समावेश आहे.
सुकेश ज्यावेळी जेलमध्ये होता त्यावेळी तो जॅकलीनसोबत संवादही साधत होता. ज्यावेळी सुकेश जामिनावर सुटला त्यावेळी त्याने चेन्नईसाठी, तर मुंबई ते दिल्लीसाठी जॅकलीनसाठी एक चार्टर्ड विमान बुक केले होते. आरोपपत्रातील दाव्यानुसार चेन्नईतील एका हॉटेलमध्ये या दोघांनीही एकत्रित मुक्काम केला होता.
जामिनावर असताना सुकेशने खासगी जेटमधून हवाई प्रवासावरच 8 कोटी रुपये खर्च केले होते. सुकेशने जॅकलीनच्या भाऊ व बहिणालाही मोठी रक्कम पाठविली होती. या रकमेबाबत ईडीने जॅकलीनचे निकटवर्तीय सहकारी आणि कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली होती. दुसरीकडे, नोरा फतेहीला सुकेशने एक बीएमडबल्यू कार आणि आयफोन गिफ्ट केला होता याची एकत्रित किंमत एक कोटींपेक्षा जास्त होती.