सुप्रीम कोर्टाचे न्यायामूर्ती भूषण गवईंच्या मुलीची पतिसह सासरच्या मंडळींविरोधात तक्रार, हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या मुलीनं हुंड्यासाठी छळ होत असल्याची तक्रार नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.
नागपूर: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या मुलीनं हुंड्यासाठी छळ होत असल्याची तक्रार नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. न्यायमूर्ती भूषण यांची कन्या करिश्मानं तिचा पती, सासू, सासरे याच्यासह पाच लोकांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. करिश्मा यांनी त्यांच्या सासूच्या दोन भावांविरोधात देखील तक्रार दिली आहे.
हुंड्यासाठी छळाची तक्रार
न्यायमूर्ती भूषण गवई यांची मुलगी करिश्मा हिचा विवाह तिच्या पेक्षा आठ वर्षानं मोठा असणाऱ्या पलाश याच्या सोबत झाला होता. लग्नानंतर काही दिवसात करिश्मानं तिच्या सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी छळ झाल्याची तक्रार केल्यानं ही घटना धक्कादायक मानली जात आहे.
करिश्मानं याप्रकरणी नागपुरातील सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. पती पलाश दरोकर, सासरे पुरुषोत्तम दरोकर, सासू ललिता दरोकर, संजय टोंगसे आणि प्रशांत टोंगेस यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. करिश्माच्या तक्रारीनंतर सीताबर्डी पोलिसांनी सासू, सासऱ्यासह तिघांना अटक केली आहे.
करिश्माचा पती फरार
करिश्मानं तक्रार दाखल केल्यानंतर पाच पैकी तीन आरोपींना अटक केली आहे. तर, करिश्माचा पती पलाश पुरुषोत्तम दरोकर आणि प्रशांत टोंगसे अशी फरार आरोपींची नावे आहेत. करिश्मा पलाश दरोकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चौकशी करून पाच जणांविरुद्ध हुंड्यासाठी छळ करणे आणि अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती समोर आली आहे.
अट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
करिश्मा दरोकरने सीताबर्डी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी अट्रोसिटी कायदा आणि हुंडाप्रतिंबधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सासू सासरे आणि पतिच्या मामाला अटक केली आहे. तर, तिच्या पतीसह फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांकडून ठिकठिकाणी शोध सुरु आहे.
इतर बातम्या:
कळणे मायनिंग सारखा विनाशकारी प्रकल्प नारायण राणेंनी आणला, आमदार वैभव नाईक यांचा आरोप
Video | वारणेकाठी आढळली तब्बल 12 फुटांची अजस्त्र मगर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
Supreme Court Justice Bhushan Gavai daughter file dowry case against husband other four people at sitabardi police station of Nagpur