सुशांतसिंग संबंधी ड्रग्ज प्रकरणाचे धागे दुबईपर्यंत, पण सूत्रधार साहिल शाहाचा चेहराच पेडलर्सना माहिती नाही

ड्रग्ज पेडलर अब्बास आणि जैद यांच्या चौकशीदरम्यान साहिलचे नाव समोर आले (Drugs Case NCB finds Dubai Connection)

सुशांतसिंग संबंधी ड्रग्ज प्रकरणाचे धागे दुबईपर्यंत, पण सूत्रधार साहिल शाहाचा चेहराच पेडलर्सना माहिती नाही
सुशांतसिंह राजपूत
Follow us
| Updated on: Apr 13, 2021 | 2:45 PM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्येचा (Sushant Singh Rajput Suicide Case) तपास करताना समोर आलेल्या ड्रग्ज प्रकरणाचा तपास नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) करत आहे. एनसीबीसमोर ड्रग्ज प्रकरणाचे दुबई कनेक्शन उघडकीस आले आहे. साहिल शाह ऊर्फ फ्लाको दुबईत बसून सूत्र हलवत असल्याचं पुढे आलं आहे. (Sushant Singh Rajput Drugs Case NCB finds Dubai Connection with mastermind Saahil Shah alias Flacko)

सुशांत सिंग राजपूतशी संबंधित ड्रग्ज प्रकरणातील मुख्य संशयिताची एनसीबीने ओळख पटवली. फ्लाको या नावाने ओळखला जात असलेला साहिल शाह या प्रकरणातील मुख्य संशयित आहे. दुबईहून तो आपल्या पेडलरच्या माध्यमातून ड्रग्जची विक्री करत असल्याचा आरोप आहे. साहिल व्हिडीओ कॉलवरुन बोलताना चेहरा ब्लर करत असल्यामुळे ड्रग पेडलर्सना त्याचा चेहराही माहिती नाही.

मालाडच्या इमारतीतील छाप्यातून साहिलची माहिती

ड्रग्ज पेडलर अब्बास आणि जैद यांच्या चौकशीदरम्यान साहिलचे नाव समोर आले होते. परंतु आजपर्यंत कोणत्याही ड्रग पेडलरने त्याला पाहिले नाही. सुशांत सिंग राजपूत ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशी दरम्यान एनसीबीने काल रात्री सुशांत आधी राहत असलेल्या मालाड भागातील एका इमारतीवर छापा टाकला होता. या छाप्यावेळी साहिलची माहिती मिळाली.

हिटलरच्या पुस्तकातून एलएसडीची तस्करी

दरम्यान, मुंबईतील सांताक्रुझ भागातून एनसीबीने एलसीडी (LSD) या ड्रग्जचे 80 ब्लॉट्स ताब्यात घेतले. अडॉल्फ हिटलरच्या बायोग्राफीच्या पुस्तकातून या ड्रग्जची तस्करी केली जात होती. डार्कनेटच्या माध्यमातून तरुण एलएसडी मिळवत असल्याचं समोर आलं आहे. बिटकॉईनसारख्या क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून यासाठी पेमेंट केले जाते. एलएसडी युरोपियन देशातून आयात केले जाते.

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) आणि डी कंपनीच्या निकटचा राजिक चिकना (Raziq Chikna) याला एनसीबीने समन्स पाठवले आहे. राजिक चिकनाचा भाऊ दानिश चिकना (Danish Chikna) याला काही दिवसांपूर्वी राजस्थानातून अटक करण्यात आली होती. दानिश दाऊदची ड्रग्ज फॅक्टर चालवत असल्याचं उघड झालं आहे. (Sushant Singh Rajput Drugs Case NCB finds Dubai Connection with mastermind Saahil Shah alias Flacko)

दानिश चिकनाला राजस्थानात अटक

दाऊद इब्राहिमचा हस्तक दानिश मर्चंट उर्फ दानिश चिकना याला एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राजस्थानमध्ये अटक करण्यात आली होती. दानिश चिकना याच्याकडे काही प्रमाणात ड्रग्ज सापडल्याची माहिती आहे. अंमली पदार्थविरोधी पथकाने दक्षिण मुंबईतील डोंगरी भागात असलेल्या दानिशच्या ड्रग्जची फॅक्टरीवर छापा टाकला होता. मात्र छापेमारीपूर्वीच निसटण्यात दानिश चिकना यशस्वी झाला होता. तेव्हापासूनच एनसीबी त्याच्या मागावर होती. अखेर राजस्थान पोलिसांच्या मदतीने त्याला जेरबंद करुन मुंबईला आणले.

संबंधित बातम्या :

बटाटा विक्रेता ते मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज माफिया; कोण आहे फारुख बटाटा?

डोंगरीत ड्रग्जची फॅक्टरी, दाऊदचा हस्तक दानिश चिकना राजस्थानमध्ये जेरबंद

(Sushant Singh Rajput Drugs Case NCB finds Dubai Connection with mastermind Saahil Shah alias Flacko)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.