टीआरपी घोटाळ्यात सचिन वाझेंनी 30 लाखांची लाच घेतल्याचा आरोप, ईडी चौकशी करणार
'बार्क' (BARC) कडून सचिन वाझे यांनी गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकाच्या मदतीने 30 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. (Sachin Vaze bribe TRP Scam )
मुंबई : ‘एनआयए’च्या अटकेतील निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Vaze) यांचा आणखी एक प्रताप उघडकीस आला आहे. टीआरपी घोटाळ्यातही (TRP Scam) वाझेंनी 30 लाख रुपये घेतले होते, अशी माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) आता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. (Suspended PI Sachin Vaze allegedly took bribe in TRP Scam from BARC)
‘बार्क’ (BARC) कडून सचिन वाझे यांनी गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकाच्या मदतीने 30 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. टीआरपी घोटाळ्याचा तपास करत असताना कंपनीच्या एक्झिक्युटिव्हना त्रास न देण्याच्या नावाखाली वाझेंनी लाच घेतल्याचं बोललं जात आहे.
भाजप नेते आशिष शेलार यांनी ‘सचिन वाझे टोळी टीआरपी घोटाळ्यात सहभागी असल्याचा दावा 15 मार्च 2021 रोजीच केला होता’ याकडे निर्देश करणारे ट्विट केले आहे.
I exposed Vaze Gang TRP Scam Extortion in 15 Mar 2021 tweet !
Media body BARC Confirms Vaze Extorted ₹ 30 lac bribe in TRP case !
Which media houses targeted by Vaze for ₹50 crores?
Where Vaze ? Godfather hiding ₹ 500 crore loot?
Nation Needs to Know ! https://t.co/VKHUmG8rGg
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) April 11, 2021
(Suspended PI Sachin Vaze allegedly took bribe in TRP Scam from BARC)
काय आहे टीआरपी घोटाळा?
“रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी काही लोकांना पैसे देऊन आपल्या घरात दिवसभर हे चॅनेल सुरु ठेवण्यास सांगण्यात आले होते. यासाठी प्रत्येकी 400 ते 500 रुपये दिले जात असत. त्यामुळे चॅनेलच्या टीआरपीत मोठी वाढ दिसून आली होती. याचा थेट फायदा जाहिराती मिळवण्यासाठी होत असे.
सचिन वाझेंचे साथीदार रियाज काजींना बेड्या
दरम्यान, सचिन वाझेंचे साथीदार एपीआय रियाज काझी यांना अटक करण्यात आली आहे. रियाज काजी यांची अनेक वेळा एनआयए (NIA)अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर एनआयएने रियाझ काझी यांची चौकशी केली होती.
सचिन वाझेच्या अटकेनंतर रियाझ काझी एनआयएच्या रडारवर आले होते. सचिन वाझे याचा सहकारी पीएसआय रियाज काझी याला एनआयएने कटात सामील असल्यामुळे आणि पुरावे नष्ट करण्यामागे महत्वाची भूमिका बजावल्यामुळे अटक केल्याची माहिती आहे
संबंधित बातम्या :
TRP Scam : BARC चा माजी सीईओ पार्थो दासगुप्ताला अटक, 2016 पासून टीआरपी घोटाळा सुरु असल्याचा आरोप
सचिन वाझेंचे साथीदार एपीआय रियाज काझी यांना अटक
(Suspended PI Sachin Vaze allegedly took bribe in TRP Scam from BARC)