शेतात महिला आणि तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ, घातपात की अन्य काही?
गावकरी नेहमीप्रमाणे सकाळी शेतावर कामाला गेले. शेतावर जाताच त्यांना समोर जे दृश्य दिसले ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर गावात एकच खळबळ माजली.
सांगली / शंकर देवकुळे : भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच जतमध्ये आज एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका प्रेमीयुगुलाचे मृतदेह आढळल्याची घटना जत तालुक्यातील रामपूर येथे घडली. उमेश अशोक कोळेकर आणि प्रियंका बाळासाहेब कोळेकर अशी मयत प्रेमीसुगुलाची नावे आहेत. या घटनेमुळे जत तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान दोन्ही घटनेबाबत घातपात असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी घातपाताविषयी पोलीस सखोल तपास करत आहेत.
शेतात वेगवेगळ्या ठिकाणी आढळले मृतदेह
रामपूर गावातल्या कोळेकर वस्ती या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी दोघांचे मृतदेह आढळून आले. गावातल्या कोळेकर वस्तीवरील शेतानजीक असणाऱ्या ओढ्याजवळ उमेश कोळेकर याचा मृतदेह आढळून आला. तर दुसऱ्या बाजूला प्रियंका बाळासाहेब कोळेकर या विवाहात महिलेचा मृतदेह आढळून आला. यानंतर गावात एकच खळबळ उडाली.
शवविच्छेदनानंतर सत्य उघड होईल
सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत पंचनामा केला. या सर्व घटनेनंतर या दोघांचेही मृतदेह आढळून आले आहेत. जत पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. शवविच्छेदन अहवालानंतर दोघांचा घातपात केला की अन्य काही हे स्पष्ट होईल, अशी माहिती जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश रामागरे यांनी दिली. पोलीस अधिक तपास करत आहेत.