ट्युशन टीचर नेहमीप्रमाणे घरी आला, घराचा दरवाजा उघडताच त्याला धक्का बसला !

आजारी पती वरच्या मजल्यावरील खोलीत होता. मुलगा कामानिमित्ता बाहेर गेला होता. घरी आजी-नातू दोघेच होते. नेहमीप्रमाणे नातवाच्या शिकवणीसाठी शिक्षक घरी आला. दरवाजा उघडताच जे दिसलं ते भयानक.

ट्युशन टीचर नेहमीप्रमाणे घरी आला, घराचा दरवाजा उघडताच त्याला धक्का बसला !
कोलकात्यात आजी-नातवाचा संशयास्पद मृत्यूImage Credit source: Google
Follow us
| Updated on: May 13, 2023 | 8:07 PM

कोलकाता : पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील महेशतला येथे दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने खळबळ उडाली आहे. एका घरातून आजी आणि नातवाचे मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. दोघांची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. महेशतला नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये शुक्रवारी रात्री ही घटना घडली. महेशतला भागात एका दुमजली घरातून 55 वर्षीय महिला आणि 7 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच जिंजिरा बाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.

मयत महिलेचा मुलगा कामानिमित्त बाहेर गेला होता

स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत माया मंडल या पती तारक, मुलगा शेखर आणि नातू सोनू यांच्यासह राहत होत्या. काही वर्षांपूर्वी शेखरचा घटस्फोट झाल्यामुळे नातू सोनू हा आजीसोबत राहत होता. शेखर शुक्रवारी कामानिमित्त बाहेर गेला होता. महिलेचे पती तारक मंडल आजारी असून, ते दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीत होते. त्यामुळे खाली काय झाले ते कळलेच नाही.

शिक्षक घरी येताच घटनेचा खुलासा

स्थानिक आणि कौटुंबिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्ध महिलेचा मुलगा मानसिकदृष्ट्या खचला आहे. दुसरीकडे वृद्ध महिलेच्या पतीलाही अर्धांगवायू झाला असून, तो बराच काळापासून अंथरुणावर पडून आहे. मृत सोनूला शिकवण्यासाठी एक शिक्षक रोज घरी येत असे. नेहमीप्रमाणे आजही शिक्षक उप्पल मंडल घरी आला. घरी आल्यावर त्याला खालच्या मजल्याचा दरवाजा ओला दिसला. त्याने दरवाजा ढकलून आत पाहिले तर त्याला एक भयानक चित्र दिसले. त्याने तात्काळ शेजाऱ्यांना माहिती देऊन पोलिसांना कळवले.

हे सुद्धा वाचा

पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु

या हत्येत कुटुंबातील व्यक्तीचाच हात असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी संपूर्ण घटनेचा तपास सुरू केला आहे. आजी आणि नातवाची हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र हत्या झाली असेल तर हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घरातून कोणतीही चोरी झाली नसल्याची माहिती मिळते. पोलीस हत्येमागची कारणे शोधत आहेत.

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....