थाटामाटात लग्न पार पडलं, घरात उत्साहाचं वातावरण होतं, नवदाम्पत्य बेडरुममध्ये गेलं अन् घरावर शोककळाच पसरली !

त्या दोघांचं विधीवत लग्न पार पडलं. नववधूसह वरात नवऱ्याच्या घरी आली. लग्नानंतरचे सर्व विधी पार पडल्यानंतर नवविवाहित जोडपे हनिमूनसाठी बेडरुममध्ये गेले. मात्र सकाळ होताच घरात एकच गोंधळ माजला.

थाटामाटात लग्न पार पडलं, घरात उत्साहाचं वातावरण होतं, नवदाम्पत्य बेडरुममध्ये गेलं अन् घरावर शोककळाच पसरली !
हनिमूनच्या रात्रीच नवविवाहित जोडप्याचा संशयास्पद मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 01, 2023 | 4:18 PM

बहराइच : उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरात मुलाचे लग्न होते. लग्न अगदी थाटामाटात पार पडले. मोठ्या जल्लोषात नव्या सुनेचे स्वागत करण्यात आले. लग्नानंतरचे सर्व रीतीरिवाज पार पडल्यानंतर नवविवाहित जोडपे हनिमूनसाठी बेडरुममध्ये गेले. सकाळ होताच घरावर शोककळा पसरली. हनिमूनच्या रात्रीच नवविवाहित जोडप्याचा संशयास्पद मृत्यू झाला. ज्या आनंद साजरा होत होता, त्या घरावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला. मुलगा आणि सुनेचा मृतदेह पाहून घरात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे संपूर्ण गावात हाहाकार माजला. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोघांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. आता शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच नवविवाहित जोडप्याच्या मृत्यूचे कारण समजेल.

बहराइचमधील कैसरगंजच्या गोदहिया क्रमांक चारमध्ये राहणाऱ्या प्रतापचा विवाह मंगळवारी 30 मे रोजी गोधिया क्रमांक दोनच्या गुल्लानपुरवा गावात राहणाऱ्या पुष्पा यादवसोबत झाला होता. मोठ्या थाटामाटात लग्नाची मिरवणूक वधूच्या दारात पोहोचली. सर्व विधी पार पाडत उत्साहात लग्नसोहळा संपन्न झाला. त्यानंतर बुधवारी नववधूला घेऊन वरात नवरदेवाकडे आली. घरात नव्या सुनेच्या स्वागताची पूर्ण तयारी करण्यात आली होती.

सकाळी जोडपं उठलं नाही म्हणून घरचे पहायला गेले तर…

रात्री नवविवाहित जोडपे झोपण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले. मात्र सकाळी बराच उशीर होऊनही दोघे बाहेर आले नाहीत. आधी कुटुंबीयांनी फारसे लक्ष दिले नाही. लग्नसोहळ्यामुळे खूप दमल्याने दोघे उशीरपर्यंत झोपले असावे, असा कुटुंबीयांचा समज झाला. मात्र बराच वेळ होऊनही दरवाजा न उघडल्याने कुटुंबीयांनी त्यांच्या खोलीचे दार ठोठावले. मात्र आतून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे घरातील सदस्य काळजीत पडले. त्यानंतर खिडकीतून डोकावले असता पुष्पा आणि प्रताप बेडवर बेशुद्ध अवस्थेत पडले होते.

हे सुद्धा वाचा

त्यानंतर कुटुंबीयांनी दरवाजा तोडून खोलीत प्रवेश केला असता, दोघेही मृतावस्थेत पडलेले दिसले. यानंतर लग्नघरात एकच गोंधळ उडाला. वधूकडच्या लोकांना प्रकरणाची माहिती देण्यात आली. तपास आणि शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.